मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर N/Aश्रीशुक उवाच - नन्दस्तत्र यदून्प्राप्ताञ्ज्ञात्वा कृष्णपुरोगमान् ।तत्रागमद्वृतो गोपैरनस्थार्थैर्दिहक्षया ॥३१॥पूर्वीं नृपांचिया आगमनीं । नंदागमन बादरायणी । वदला तेंचि हें व्याख्यानीं । सिंहालोकना निरूपी ॥२२५॥महापर्वकाळ उपरागयात्रा । करावयाकारणें कुरुक्षेत्रा । यादव आले हें नंदश्रोत्रा । वार्तामात्र स्पर्शतां ॥२६॥उताविळ अंतःकरणीं । यादव आले हें जाणोनी । रामकृष्णप्रमुख वृष्णि । भेटीलागूनि हरिखेला ॥२७॥आणिके ठायीं जरी उतरावें । तरी दूरस्थदर्शना यावें जावें । कृष्णा सहवास तेणें न फवे । ऐशिया भावें उताविळा ॥२८॥वोझीं तैसींच गाडियांवरी । यात्रोपकरण सर्व सामग्री । आला यादवां शेजारीं । धरूनि अंतरीं दर्शनेच्छा ॥२९॥यादवांसमीप प्रशस्त मही । देखोनि नंद उतरला पाहीं । कितेक राहिले दुमाचे ठायीं । वस्त्रगृहीं कितेक ॥२३०॥तं दृष्ट्वा वृष्णयो हृष्टास्तन्वः प्राणमिवोत्थिताः । परिषस्वजिरे गाढं चिरदर्शनकातराः ॥३२॥देखोनि अकस्मात नंदातें । वृष्णि पावती आनंदातें । ग्राण येतां शरीरातें । तेंवि सचेत ऊटियले ॥३१॥अवचिता नंद पडतां दृष्टी । परमानंद उथळला पोटीं । सर्व उठिले झडझडाटीं । सप्रेम कंठीं आलिंगिती ॥३२॥बहुतां दिवसांचें दर्शन । तेणें सप्रेमभरित मन । हृदयीं गाढ आलिङ्गन । देतां नयन पाझरती ॥३३॥वसुदेवः परिष्वज्य संप्रीतः प्रेमविह्वलः । स्मरन्कंसकृतान्क्लेशान्पुत्रन्यासं च गोकुले ॥३३॥वसुदेव देखोनि नंदाप्रति । हृदयीं कवळूनि परमप्रीति । स्नेहें विह्वल जाली वृत्ति । स्मरे चित्तीं उपकार ॥३४॥कंसें आपणा दिधले क्लेश । ते ते स्मरोनियां अशेष । तैं गोकुळीं पुत्रन्यास । केला निःशेष तो आठवी ॥२३५॥कंसें आम्हां रोधिलें निगडीं । यादव जाले देशोघडी । कोण्ही न पवे ते सांकडीं । भये हडबडी भूभाग ॥३६॥कोठें ठाव नेदी मही । समीप न ठाके कोण्हीही । दादो तुम्ही ऐसिये समयीं । लेंकुरां दोहीं वांचविलें ॥३७॥आप्त जाणोनियां आमुचे । कंस लुंठन करी त्यांचें । हृदय करूनियां वज्राचें । केलें कुमरांचें पाळण तां ॥३८॥तुझा उपकार सविस्तरी । लिहितां न पुरे हे धरित्री । आनंदाश्रु ढळती नेत्रीं । सद्गदवक्रीं हें वदतां ॥३९॥तंव पातले राममुरारी । नंदयशोदे देखोनि नेत्रीं । मस्तकें ठेवूनि चरणांवरी । दंडापरी वंदूनियां ॥२४०॥कृष्णरामौ परिष्वज्य पितरावभिवाद्य च । न किञ्चनोचतुः प्रेम्णा साश्रुकण्ठौ कुरूद्वह ॥३४॥कंठीं घालूनियां मिठी । पितरें कवळिलीं सस्निग्ध भेटी । प्रेमें शब्द न फुटे कंठी । नेत्रपाटीं जळ वाहे ॥४१॥कौरवधुर्या परीक्षिति । ऐसी रामकृष्णांप्रति । अवस्था जाकळी ते तुज निगुती । नोहे शक्ति मज कथनीं ॥४२॥तावात्मासनमारोप्य बाहुभ्यां परिरभ्य च । यशोदा च महाभागा सुतौ विजहतुः शुचः ॥३५॥तैसेचि नंदे हृदयीं गाढ । रामकृष्ण कवळिले दृढ । यशोदाही प्रेमारूढ । दोहीं बाहीं आलिङ्गी ॥४३॥सुस्निग्धप्रेमाचिये भरीं । पंच वर्षांच्या लेंकुरांपरी । दोघां घेऊनि अंकावरी । अश्रु नेत्रीं विसर्जिती ॥४४॥नेत्रीं स्रवती बाष्पबिन्दु । कीं तो वियोगदुःखसिन्धु । तेणें मागें लोटतां खेदु । जाणों सद्यः परिहरिला ॥२४५॥नेत्र परिमार्जूनि हातीं । विशोक अंतर स्थिराविती । सुस्निग्ध सप्रेमाची जाती । पुढती पुढती उचंबळे ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP