मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७९ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ७९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७९ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर प्रविश्य रेवामगमद्यत्र माहिष्मती पुरौ । मनुतीर्थमपस्पृश्य प्रभासं पुनरागमत् ॥२१॥ मत्स्यावतार जिये क्षेत्रीं । तो कश्यपाश्रम देखूनि नेत्रीं । मनुतीर्थीं सहपरिवारीं । सुस्नात जाहला हळायुध ॥६६॥गंगायमुनांचा संगम । तो तीर्थराज प्रयागोत्तम । भरद्वाजाचा पुण्याश्रम । वंदूनि बळराम परतला ॥६७॥जेथूनि आरंभिली यात्रा । पुढती तया प्रभासक्षेत्रा । आला एका संवत्सरा । करूनि फेरा भरतवर्षा ॥६८॥यात्रा करूनियां संपूर्ण । पूर्णतेचें विधिविधान । तदंग तोषविले ब्राह्मण । निर्जरगणासमवेत ॥६९॥श्रुत्वा द्विजैः कथ्यमानं कुरुपाण्डवसंयुग । सर्वराजन्यनिधनं भारं मेने हृतं भुवः ॥२२॥तेथ अभ्यागतीं ब्राह्मणीं । कुरुक्षेत्रींची वार्ता श्रवणीं । घातली कीं कौरवश्रेणी । पडिल्या रणीं भूभुजेंसीं ॥१७०॥कौरवपक्षपाती भूवर । तिहींसहित सर्व गान्धार । पडिले ऐकूनि रोहिणीकुमर । मानी भूभार उतरला ॥७१॥कौरवीं पाण्डवेंसीं समर । करितां तत्प्रसंगें नृपवर । केवळ जे कां असुरावतार । जाला संहार तितुक्यांचा ॥७२॥भीष्म द्रोण जयद्रथ । कर्ण शल्य सौबळसुत । आणि धार्तराष्ट्रही समस्त । पावले अंत समराङ्गणीं ॥७३॥एक उरला दुर्योधन । तेणें करूनि पलायन । द्वैपायनाख्य ह्रदीं लीन । जळीं लपून राहिला ॥७४॥पाण्डवीं धुण्डितां नाना विधी । दुर्योधनाची न लभे शुद्धि । सचिन्त पाण्डव म्हणती युद्धीं । कार्यसिद्धी न साधली ॥१७५॥दुर्योधनातें वधूनि रणीं । धर्मराजें लाहिजे धरणी । अदृष्टाची विपरीत करणी । जे गेला पळोनि गान्धार ॥७६॥ऐसे रसरसिती पाण्डव । त्यांहूनि विशेष वासुदेव । पाञ्चाळादि नृपवर सर्व । म्हणती हांव न संडिजे ॥७७॥तंव भीमाचे पारधी । तिहीं दुर्योधनाची शुद्धी । भीमापाशीं यथाविधी । कथिली येऊनि साकल्यें ॥७८॥पारधी करूनि उत्तम पिशितें । घेऊनि येत असतां पंथें । द्वैपायनाख्य ह्रदीं अवचितें । रहस्य कांहीं ऐकियलें ॥७९॥द्रौणि कृतवर्मा गौरम । दुर्योधनासीं गुह्य परम । द्वैपायनाख्य ह्रदीं संगम । करूनि वदले सविस्तर ॥१८०॥हें गुह्य भीमा निषादीं कथिलें । तेणें धर्मार्जुनां जाणविलें । कृष्णादिकीं ऐकूनि वहिलें । ह्रदा पातले तत्काळ ॥८१॥दुर्योधनातें नानापरी । बोधितां सज्ज नोहे तो समरीं । मग त्या धर्में मधुरोत्तरीं । बोधूनि बाहेरी काढियला ॥८२॥सुयोधन म्हणे मी एकाकी । क्षतीं जर्ज्जर परम दुःखी । सज्ज नोहें आयोधनमुखीं । राज्याभिलाषी होऊनियां ॥८३॥धर्में प्रतिज्ञा केली त्यासीं । पांचांमाजि तूं भिडशी ज्यासीं । त्यातें जिंङ्किल्या आम्हां सर्वांसी । निर्द्धारेंसी जिङ्कियलें ॥८४॥दुजा साह्य नोहे कोण्ही । ऐसी धर्माची सत्य वाणी । ऐकोनि भीमा समराङ्गणीं । गदापाणी पाचारी ॥१८५॥ऐसी द्विजांच्या मुखें वार्ता । रामें कुरुक्षेत्रींची ऐकतां । निवारावया त्या उभयतां । जाता जाला तें ऐका ॥८६॥स भीमदुर्योधनयोर्गदाभ्यां युध्यतोर्मृधे । वारयिष्यन्विनशनं जगाम यदुनन्दनः ॥२३॥गदापर्वीं यमुनातटीं । रामा नारदाची भेटी । तेणें कथिली हे राहटी । कुरुक्षेत्रींची रामातें ॥८७॥येणें यात्राङ्गपरिवारा । पाठवूनियां द्वारकापुरा । आपण पातला कुरुक्षेत्रा । भीमगान्धारां वारावया ॥८८॥विनशन कुरुक्षेत्राचें नाम । तेथ जाऊनि तो बळराम । गदापाणि सुयोधन भीम । करितां संग्राम निकराचा ॥८९॥त्यांसि वारीन ऐसिया बुद्धी । गेला कुरुक्षेत्रा त्रिशुद्धी । कृष्ण पाण्डव हृदयमधीं । राम देखूनि दचकले ॥१९०॥युधिष्ठिरस्तु तं दृष्ट्वा यमौ कृष्णार्जुनावपि । अभिवाद्याभवंस्तूष्णीं किं विवक्षुरिहागतः ॥२४॥नकुळ सहदेव धर्मार्जुन । तैसाचि देवकीनंदन कृष्ण । बळरामातें करूनि नमन । मौन धरूनि राहिले ॥९१॥काय बोलावया कारणें । येथ बळरामाचें येणें । अलोट आज्ञा ज्येष्ठपणें । यास्तव भेणें न बोलती ॥९२॥असो रामें उभय शिष्य । प्रवर्तले द्वंद्वयुद्धास । आत्मोपदिष्ट कृताभ्यास । कौशल्यास दर्शविती ॥९३॥गदापाणी उभौ दृष्ट्वा संरब्धौ विजयैषिणौ । मण्डलानि विचित्राणि चरन्ताविदमब्रवीत् ॥२५॥दोघे सुभट गदापाणी । प्रवर्त्तले समराङ्गणीं । विजयवाञ्छा धरूनि मनीं । सक्रोध हननीं उदायुध ॥९४॥परस्परें गदाप्रहारीं । गात्रें निथळताति रुधिरीं । यथाशिक्षित मंडळें भ्रमरी । देती समरीं मल्लवत ॥१९५॥चटचटां वाजती गदाप्रहार । खटखटां दशन रगडिती क्रूर । तटतटां उडती महावीर । शक्रवृत्रपडिपाडें ॥९६॥तयां उभयतांतें देखून । बोलता जाला स्निग्धवचन । कौरवकुळपां सावधान । तें संपूर्ण अवधारीं ॥९७॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP