मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर ययातिनैषां हि कुलं शप्तं सद्भिर्बहिष्कृतम् । वृथापानरतं शश्वत्सपर्यां कथमर्हति ॥३६॥ययातीनें जयांचें कुळ । निश्चयें शापूनि केलें समळ । सज्जनें बहिष्कारिलें केवळ । आचारबरळ म्हणोनियां ॥४४॥सर्वदा करिती वृथापान । ऐसे केवळ आचारहीन । ऐसिया योग्य अग्रपूजन । बोला वचन सदस्य हो ॥३४५॥ऐसा निद्नी चैद्यराव । गिरा प्रतिपादी वास्तव । तोही अर्थ कोविद सर्व । ऐका अपूर्व लापनिका ॥४६॥ययातीनें यांचें कुळ । जह्री शापूनि केलें समळ । तरी सज्जनीं अत्यंत अमळ । जाणोनि मौळीं वंदिलें ॥४७॥अमळ कैसें म्हणाल जरी । तरी आम्हां भूपाळांचिये परी । नोहे सर्वथा दुराचारी । सर्वदा न करी वृथापान ॥४८॥नियताचारें विधिपालन । करूनि स्वधर्मसंस्थापन । इतरां सन्मार्गप्रदर्शन । अनुशासन हें ज्याचें ॥४९॥यदुकुळाचा महिमा ऐसा । न भंगे ययातिशापासरिसा । तेथें हा श्रीकृष्ण परेश कैसा । तुळिजे सहसा नृपतुलने ॥३५०॥तस्मात् सपर्यामात्र यातें । योग्य नव्हे हें जाणा निरुतें । याचें स्वरूप त्रिपुटीपरतें । पूज्य पूजकपूजनादि ॥५१॥यावीण भिन्न नसेचि कांहीं । तरी पूजक पूजन करील कायी । चैद्य वदला यथार्थ पाहीं । मूर्खप्रवाहीं निंदोक्ति ॥५२॥पुढती वदे दामघोषी । कुटिलोक्ति ज्या निन्दा दोषी । त्या वाग्देवी यथार्थभाषी । अतिनिर्दोषी वाखाणी ॥५३॥ब्रह्मर्षिसेवितान्देशान्हित्वैतेऽब्रह्मवर्चसम् । समुद्रं दुर्गमाश्रित्य बाधते दस्यवः प्रजाः ॥३७॥पूर्वश्लोकीं आचारबरळ । ऐसें बोलिला जें शिशुपाळ । तेंचि ये श्लोकीं प्राञ्जळ । पुन्हां कुटिळ प्रतिपादी ॥५४॥यादव आचारबरळ कैसे । प्रजापीडक दस्यु जैसे । दुर्गमस्थळाच्या आश्रयवशें । प्रजा पीडिती सर्वत्र ॥३५५॥वेदोदित जो आचारमार्ग । जिये देशीं चाले साङ्ग । तो देश सेविती अभंग । साङ्गोपाङ्ग ब्रह्मर्षि ॥५६॥वेदोदित क्रियाचरणें । ब्रह्मवर्चस त्यातें म्हणणें । इहीं तें टाकूनि प्राणरक्षणें । समुद्रदुर्ग आश्रयिलें ॥५७॥ब्रह्मर्षि सेविती जो देश । यादवीं टाकूनि तो निःशेष । समुद्रदुर्गीं करूनि वास । दस्यु प्रजांस पीडिती हे ॥५८॥ऐसिया अग्रपूजा यजमानें । दिधली कोण्या योग्यतागुणें । योग्ययोग्य सदस्यीं पाहणें । कीं प्रशंसा करणें हें उचित ॥५९॥इत्यादिनिन्देचिया वचनीं । यदुकुळ निन्दी चैद्याग्रणी । वास्तवबोधें गीर्वाणवाणी । पदसंदर्भें प्रतिपादी ॥३६०॥तीच श्लोकान्वययोजना । वास्तवबोधें प्रतिपादना । निंदेमाजी प्रकटी स्तवना । पदलापना ते ऐका ॥६१॥वेदोक्तविहिताचरणनिष्ठ । ब्रह्मवर्चस्वी राजे श्रेष्ठ । प्रजापीडक दस्यु दुष्ट । त्या दुष्टां कष्ट ते देती ॥६२॥तया राजयांचिया भेणें । दुष्टीं करूनि पलायनें । कीकटादि अब्रह्मण्यें । निन्द्य भुवनें वसविती ते ॥६३॥जो देश न सेविती ब्रह्मर्षी । अनर्ह वेदोदितकर्मासी । दुष्टीं राहूनि ऐसिये देशीं । पीडिजे प्रजांसी दुष्टत्वें ॥६४॥तरी हा यादवां नाहीं दोष । सेविती ब्रह्मर्षि जे देश । तेथें राहूनि सावकाश । अब्रह्मवर्चस सांडविती ॥३६५॥पूर्वीं विष्णूनें दैत्यहनन । करूनि केलें धर्मस्थापन । तैं जे थ क्षाळिलें सुदर्शन । तें अतिपावन चक्रतीर्थ ॥६६॥गोमतीरत्नाकरसंगम । जेथ प्रकटूनि त्रिविक्रम । कुश मर्दूनि केलें धाम । मोक्षद परम त्रिजगातें ॥६७॥परम पावन ते कुशस्थळी । महर्षी देवर्षी ब्रह्मर्षी सकळीं । जेथ वसिजेत सर्वकाळीं । ते यदुकुळीं आश्रयिली ॥६८॥ब्रह्मज्ञानें मोक्ष घडे । अथवा काशींत देह पडे । गोमतीस्नानमात्रें निवाडें । प्राणी रोकडे जेथ वरिती ॥६९॥तस्मात ब्रह्मर्षिसेवित देश । आश्रयूनियां यादवेश । ब्रह्मवर्चस सावकाश । प्रतिपादिती आचरणें ॥३७०॥आणि दस्यु जे प्रजावेषी । चोर उत्पथ महादोषी । त्यांतें दंडिती प्रतापेंसी । हे यदुवंशीं वर्तणुक ॥७१॥अब्रह्मवर्चस सांडविती । तेही ऐका कोणे रीती । समुद्रदुर्ग दुष्प्रवृत्ती । साधूंप्रति भ्रामक जे ॥७२॥अबह्मवर्चस जे पाखंड । वेदविरुद्धाचरणबंड । मुद्रालिंगधारणें दृढ । अवघें थोताण्ड वेदबाह्य ॥७३॥मुद्रासहित लिंगधारणें । समुद्र ऐसें त्यातें म्हणणें । दुर्ग म्हणिजे कवण्या गुणें । तेंही श्रवणें अवधारा ॥७४॥पाखंड आणी झळफळित । अधर्म परंतु धर्मवत । भाविकां गमे भक्तिपंथ । भांबावत जन तेणें ॥३७५॥पाखंडमार्ग न गमें कोणा । धर्मपथाचि भासे जनां । निगूधत्वें दुर्गाभिधाना । यया वचना पात्रता ॥७६॥मुद्रासहित लिङ्गधारणें । अतर्क्य अधर्म दुर्गमपणें । ऐसीं समुद्रदुर्गाचरणें । यादवशासनें सांडविती ॥७७॥अब्रह्मवर्चस जें पाखण्ड । अतर्क्य अधर्मकारक बंड । तें मत खंडूनि करिती दंड । ऐसे प्रचंड यदुवीर हे ॥७८॥घेऊनि प्रजांची अवगणी । देशोदेशीं दस्युxxणी । त्यांतें बाधती हे हुडकुनी । स्वधर्माचरणीं ते प्रवर्तविती ॥७९॥लावितां न लागती धर्मपथा । तया दंडूनि देती व्यथा । ऐसी यदुवर्यांची कथा । कोण दुर्वक्ता निन्द्य म्हणे ॥२८०॥यास्तव दुजा यादवांहून । कोण धार्मिक ब्रह्मिष्ठ मान्य । ऐसें निन्देमाजी स्तवन । वदली संपूर्ण वाग्देवी ॥८१॥एवमादीन्यभद्राणि बभाषे नष्टमंगलः । नोवाच किंचिद्भगवान्यथा सिंहः शिवारुतम् ॥३८॥इत्यादिकां अभद्रा वचनीं । बोलता झाला चैद्य ते क्षणीं । कीं तो अनष्तमंगळ म्हणोनी । सायुज्यवरणीं केळवला ॥८२॥सदेह चैद्यासनाचा भंग । पावावयासि झाला योग्य । यास्तव नष्टमंगळप्रसंग । कोविद चांग वाखाणिती ॥८३॥ऐशीं शतशःनिन्द्यवचनें । ऐकूनियां जनार्दनें । किंचितही न बोलतां मौनें । परावरज्ञें उपेक्षिलीं ॥८४॥शिवाशब्दें बोलिजे भालु । तिणें केला बहु कोल्हाळु । तो ऐकतां राहे निश्चळु । न वदे अळुमाळु सिंह जैसा ॥३८५॥शब्द निघाले अपानद्वारें । पंडित न म्हणती त्यां अक्षरें । दुर्गंधि मात्र क्षण एक पसरे । वायुप्रसारें विध्वंसे ॥८६॥तैसें चैद्याचें भाषण । कृष्णें साहिलें धरूनि मौन । परंतु भगवन्निन्दाश्रवण । होतां सज्जन दुखवले ॥८७॥भगवन्निदनं श्रुत्वा दुःसहं तत्सभासदः । कर्णौ पिधाय निर्जग्मुः शपंतश्चेदिपं रुषा ॥३९॥ऐसी भगवंताची निन्दा । ऐकूनि समस्तां सभासदां । दुःकें साहूं न शकवे कदा । परम विषादा वरपडले ॥८८॥श्रवणीं घालूनियां बोटें । तेथोनि निघाले झडझडाटें । सक्रोध चैद्या शापिती वोठें । ओखटें दुष्टें अनुष्ठिलें ॥८९॥मृत्यु समीप आला यासी । म्हणोनि प्रवर्तला निन्देशी । दूषण ठेवूनि सदस्यांसी । वृथा प्राणांसी मुकेल ॥३९०॥जैसा दीप निवान्तमंदिरीं । सरतां आयुष्य स्नेहसामग्री । सूत्र जाळूनि उभारे भारी । क्षणामाझारी विझावय ॥९१॥तेंवि चैद्याची भरली घडी । मुमूर्षु सन्निपातें बडबडी । अमर्यादेची अरुचि तोंडीं । विषादें खोडी कर पद पैं ॥९२॥ऐसें बोलूनियां सज्जन । हस्तें झांकूनियां कर्ण । तेथूनि निघाले झडझडून । काय म्हणोन तें ऐका ॥९३॥हरीची अथवा हरिभक्तांची । श्रवणीं निन्दा ऐकतां साची । तेथूनि न निघे जो तयांची । बुद्धि तत्पापीं संक्रमली ॥९४॥निंदां भगवतः शृण्वंस्तत्परस्य जनस्य वा । ततो नापैति यः सोऽपि यात्यधः सुकृताच्च्युतः ॥४०॥निन्दकातुल्य तोही झाला । सद्य सुकृतापासूनि च्यवला । अंधतमातें पावला । यालागीं भला तेथ न वसे ॥३९५॥ऐसा निश्चय श्रुतिपुराणीं । तो प्रकट वदोनि तेथ सज्जनीं । बोटें घालूनि उभयश्रवणीं । गेले उठोनि तत्काळ ॥९६॥तया समयीं पृथाकुमर । भीमार्जुन युधिष्ठिर । नकुळ सहदेव राजे अपर । क्षोभले समग्र तें ऐका ॥९७॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP