मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर एक एवाद्वितीयोऽसावैतदात्म्यमिदं जगत् । आत्मनाऽऽत्माश्रयाः सभ्याः सृजत्यवति हंत्यजः ॥२१॥सकळ सभ्यां सहदेव म्हणे । मद्वाक्य विवरिजे सदस्यगणें । एवं या अव्ययें निश्चय करणें । एक अद्वितीय हा कृष्ण ॥९२॥एतदात्मक जग हें सत्य । ऐसा सिद्धांत श्रुतिप्रणीत । यदर्थीं शंका ते किमर्थ । इत्थंभूत उमजलिया ॥९३॥आत्मानात्माश्रयभगवान । चिद्विलासमय भगवान । याचें सृजनावनसंहरण । हरिहरदुहिणगुणात्मक ॥९४॥ऐसी शंका धरिली चित्तीं । तरी या मायिका गुणमूर्ती । माझा नियंता श्रीपति । अज अव्यय अविनाश ॥१९५॥स्वप्न देखोनि जागृतीं आला । स्वप्न प्रपंच विस्तारिला । जागृत होतां उपसंहारला । स्वयें उरला एकात्मा ॥९६॥स्वप्नें देखिलीं उच्चावचें । त्याचे पदरीं शुभाशुभ कैचें । अवघे वयुन प्रसुप्ताचें । तदाकारें प्रस्फुरित ॥९७॥तैसा अज अव्यय श्रीहरी । अलिप्त कर्मादिसंस्कारीं । जीवमृगांतें मृगाम्बापरी । वेधी संसारीं तें ऐका ॥९८॥विविधानीह कर्माणि जनयन्यदवेक्षया । ईहते यदयं सर्वः श्रेयो धर्मादिलक्षणम् ॥२२॥अन्यनिरपेक्ष स्वतंत्र । केवळ आत्मा श्रीधर । यालागीं अजन्म अक्षर । परात्परतर परमात्मा ॥९९॥स्वप्नप्रपंचाचें जनन । पाळन आणि उपसंहरण । सुषुप्तिगर्भीं त्रिव्ध जाण । अलिप्त आपण तद्रष्टा ॥२००॥ज्याचें अनुग्रहकृपादृष्टी । तपोयोगादिकर्मराहाटी । करूनि अवघी जनपदसृष्टी । कल्याणपुष्टी साधितसे ॥१॥वेदप्रणीत ज्याची आज्ञा । विश्वासोनि वैध्यवचना । जन आचरती कर्माचरणा । तत्फलदाना दायक जो ॥२॥धर्मलक्षण जें कल्याण । सर्वप्रकारें आचर जन । ज्याच्या अनुग्रहें तत्फळदान । तो हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ॥३॥तस्मात्कृष्णाय महते दीयतां परमार्हणम् । ऐवं चेत्सर्वभूतानामात्मनश्चार्हणं भवेत् ॥२३॥तत्मात् कृष्ण सचराचर । पूर्णचैतन्य परमेश्वर । प्रकट असतां कां विचार । अग्रपूजनीं करावा ॥४॥महच्छब्दें परब्रह्म । अणुही अंतर्गत जो सूक्ष्म । अग्रपूजा परमोत्तम । या कारण समर्पिजे ॥२०५॥जाणूनि ऐसिया श्रीकृष्णातें । समर्पील अग्र्यार्हयणातें । तरी आपणासहित सर्वभूतांतें । साङ्ग समर्हण तें होय ॥६॥पुढती माद्रेय बोले वचन । झणें शंका मानील मन । जें आपण करितां कृष्णपूजन । ते आपणालागून केंवि होय ॥७॥कृष्ण पूज्य आपण पूजक । प्रकट असतां हा विवेक । आपणा आपण पूजिलें देख । केंवि हें सम्यक घडेल ॥८॥तरी हा ऐका अभिप्राय । सर्व भूतात्मा वासुदेव । वर्तमान भूतभाव्य । श्रुतिनिर्धार हा वदती ॥९॥सर्वभूतात्मभूताय कृष्णायानन्यदर्शिने । देयं शांताय पूर्णाय दत्तस्यानंत्यमिच्छता ॥२४॥सर्वभूतांचा आत्मभूत । तया कृष्णाकारणें येथ । अग्रपूजा इत्थंभूत । देईजे निश्चित यजमानें ॥२१०॥अन्यदर्शीं तो भेदज्ञ । कृष्ण केवळ भेदशून्य । या कारणें अग्र्यार्हण । दीजे संपूर्ण फळार्थ ॥११॥अणूचाही हृदयंगम । महत्त्वें केवळ परब्रह्म । तयामाजी भेदागम । कोण पां अधम प्रतिपादी ॥१२॥अणूपासूनि ब्रह्मवरी । ज्याचें पूर्णत्व चराचरीं । तेथ आत्मपूजेची कुसरी । मानोनि बाहेरी कें उरिजे ॥१३॥म्हणाल श्रीकृष्ण या ठायीं । भेद संभव देखिजे कांहीं । अभेद एवात्मा तो कहीं । पूतनादि वधूं शकता ॥१४॥तरी पूर्णचैतन्य भेद न सरे । भेदसंकल्पें पूतना मरे । अभेदबोधें आत्माकारें । समरसी नुरे शत्रुत्वें ॥२१५॥म्हणाल कृष्ण असहिष्णुता । क्रोधें अधादिदैत्यघाता । केलें ऐसें दूषण शांता । विषश्चितीं न मानावें ॥१६॥भेदसंकल्पें दैत्य मेले । कृष्णें आत्मत्वें ते स्वीकेले । भेदबोधें त्यांतें त्यजिलें । हें नाहें कथिलें आम्हांसी ॥१७॥राज्याभिलाषें कंसवध । हा पूर्णासि नलगे बाध । कृष्ण पूर्णत्वें अगाध । सहसा नृपपद इच्छीना ॥१८॥सर्वात्मकत्वें जो सहिष्णु । अभेदबोधें अनिच्छ पूर्णु । त्या कृष्णाकारणें अग्र्यार्हणु । सदस्यगणीं समर्पिजे ॥१९॥ऋतुसुकृतें पावती अंत । कृष्णार्पणें ते अनंत । जाणोनि यजमानें इत्यंभूत । रुक्मिणीकान्त अर्चावा ॥२२०॥श्रीकृष्णाचा वास्तवमहिमा । उपासकत्वें भक्तोत्तमा । विदित म्हणोनि सहदेवनामा । वदला धर्मा ते काळीं ॥२१॥इत्युक्त्वा सहदेवोऽभूत्तूष्णीं कृष्णानुभाववित् । तच्छ्रुत्वा तुष्टुवुः सर्वे साधु साध्विति सत्तमाः ॥२५॥श्रीकृष्णाचा अनुभाव विदित । म्हणोन सहदेव सुनिश्चित । इतुकें बोलोनियां मौनस्थ । होऊनि निवान्त राहिला ॥२२॥हें ऐकूनि भला भला । साधुवादें गौरविला । सदस्यसत्तमें पूजिला । सर्वीं स्तविला सुशब्दें ॥२३॥अग्रपूजेचा निर्धार । केला सहदेवें साचार । पूजनार्ह रुक्मिणीवर । जयजयकार प्रवर्तला ॥२४॥सदस्य म्हणती हा माद्रेय । पाहतां याचें धाकुटें वय । अगाध याचा कृतनिश्चय । धन्य माय प्रसवली या ॥२२५॥धन्य धन्य भला भला । सदस्यीं जयजयकार केला । ऋत्विजीं मुनिवर्गीं पूजिला । साधुवादें शुभवचनें ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP