मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एवं युधिष्ठिरो राजा जरासंधवधं विभोः । कृष्णस्य चानुभावं तं श्रुत्वा प्रीतस्तमब्रवीत् ॥१॥एवं म्हणिजे पूर्वोक्त रीती । कृष्णयुधिष्ठिर उभयतांप्रती । सत्वावस्था बाणली होती । ते मागुती ओसरली ॥८॥लब्धस्मृति धर्मराजा । जरासंधवध बरवे वोजा । आणि श्रीकृष्णैश्वर्यतेजा । ऐकूनि गुज बोलतसे ॥९॥जरासंधाचिया वधातें । श्रीकृष्णाच्या अनुभावातें । ऐकूनि सप्रेमभरितचित्तें । बोलता झाला श्रीकृष्णा ॥१०॥चकारार्थें आपल्या मनीं । निजाधिकारातें विवरूनी । तदनुसार मंजुळ वाणी । बोले वदनीं सप्रेमें ॥११॥कैसा लक्षिला निजाधिकार । तोही ऐकावा विचार । कृष्ण केवळ जगदुद्धार । आपण पामर सामान्य ॥१२॥त्या कृष्णातें आज्ञा करणें । पाहतां अयोग्य बहुतां गुणें । तथापि समर्थें पूर्णपणें । सिद्धी नेणें हें उचित ॥१३॥ऐसा लक्षूनि अभिप्राव । बोलता झाला धर्मराव । श्रीकृष्णाचें ऐश्वर्यविभव । अयोग्यत्व आपुलेंही ॥१४॥तया शब्दाची कडसणी । परिसें कौरवचूडामणी । जया शब्दें चक्रपाणी । अंतःकरणीं सुखावला ॥१५॥युधिष्ठिर उवाच - ये स्युस्त्रैलोक्यगुरवः सर्वे लोकमहेश्वराः । वहंति दुर्लभं लब्ध्वा शिरसैवानुशासनम् ॥२॥कुरुकुळवंशाचें मंडन । केवळ धर्माचा नंदन । तो युधिष्ठिर प्रस्तावेन । म्हणे वचन अवधारा ॥१६॥जे कां त्रिजगामाजी थोर । प्रवृत्तिनिवॄत्तीचे ईश्वर । यालागीं ते सर्वेश्वर । श्रेष्ठ गुरुवर सुरासुरां ॥१७॥निवृत्तीमाजी सनकादिक । जगद्वंद्य जे कां मुख्य । तेहे वोडविती मस्तक । अनुशासना जयाचिया ॥१८॥प्रवृत्तीप्रतिपादक ईश्वर । विधि हर शक्र वैश्वानर । यम निरृति वरुण कुबेर । सहसमीर ईशान ॥१९॥इत्यादि लोकपाळ पृथक । ईश्वरत्वें मिलती मुख्य । तेही अनुशासनें सम्यक । वाहती मस्तक वोडवुनी ॥२०॥प्रजा राजाज्ञेतें शिरीं । वाहती म्हणाल जैसिया परी । हेही आज्ञा तैसिया परी । बळात्कारें न लंघिती ॥२१॥तैसें येथींचें रहस्य नोहे । मर्त्यां अमृत जेणें भावें । दुर्लभ लाभतां तें आघवें । घेती जीवें अनुसरूनी ॥२२॥कीं दरिद्रियाच्या कमलालया । प्रसन्न होऊनि येतां निलया । दुर्लभ जाणोनि तिचिया पाया । मस्तक बैसणें जेंवि करिती ॥२३॥तैसा आज्ञेचा दुर्लभ । सर्वांहूनि मानिती लाभ । तो तूं प्रत्यक्ष पद्मनाभ । सगुण सुलभ ये काळीं ॥२४॥स भवानरविंदाक्षो दीनानामीशमानिनाम् । धत्तेऽनुशासनं भूमंस्तदत्य्म्तविडंबनम् ॥३॥पामर जीव अनाथ दीन । तथापि धरिती राज्याभिमान । वाहती त्यांचे आज्ञाप्रमाण । हें विडंबन तुज साजे ॥२५॥भूमन् म्हणिजे अपरिच्छिन्ना । भो भगवंता अरविन्दनयना । मादृशांची वंदिसी आज्ञा । सुहृदानुकरणा दावूनी ॥२६॥प्रभुत्वें नृपाची आज्ञा शिरीं । सामान्य वंदिती जयापरी । तयाकरूनि जाणिजे इतरीं । लघिष्ठगरिष्ठपण जैसें ॥२७॥तेंवि मादृश जीव दीन । परि आंगीं नृपाभिमान । वाहसी त्यांचें अनुशासन । तेणें सामान्य तूं नव्हसी ॥२८॥श्रेष्ठें कनिष्ठालागूनी । भजतां होय तेजोहानी । तें कां पां मजलागूनी । नोहे म्हणसी तरी ऐक ॥२९॥न ह्येकस्याद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः । कर्मभिर्वर्धते तेजो ह्रसते च यथा रवेः ॥४॥कर्मफळभोक्ते पृथक जीव । कर्मानुसार त्यांचें दैव । नृपासनारूढ राव । किङ्करसमुदाव वोळगणे ॥३०॥कर्मसंस्कारें पृथक पृथक । तत्फळभोक्ते जीव अनेक । तारतम्य जाणती लोक । सेव्यसेवक म्हणोनियां ॥३१॥जेंवि किटणाचीं कुशलपणें । शिल्पिक निर्मिती राजोपकरणें । चित्रिलीं लखलखिती सुवर्णें । होती तेणें मूल्याढ्यें ॥३२॥तेंवि केवळ सुवर्णमय । निर्मिला उपकरसमुदाय । सबाह्य जेंवि तो अद्वितीय । किटनप्राय न म्हणावा ॥३३॥भिजतां जळतां भंग होतां । किटणमूल्य होय वृथा । तैसी सुवर्णा न्यूनता । नोहे महत्त्व उणें पुरें ॥३४॥सुवर्णाचा खंडेराव । श्वान सेवक म्हाळसा अश्व । एक्या मूल्यें तुकती सर्व । नोहे महत्त्व उणें पुरें ॥३५॥तेंवि तूं अद्वितीय परब्रह्म । एक परमात्मा कैवल्यधाम । तुझें तेज न्यूनोदाम । न करवे कर्मश्रेणीतें ॥३६॥उदयास्तादिकर्मेंकरून । भास्करतेजा क्षयवर्धन । नोहे जैसा तैसा पूर्ण । प्रकाशघन स्वस्वरूपें ॥३७॥दृश्या जितुकी स्थळोपाधी । तच्छायेतें ह्रासवृद्धी । नयनीं देखूनि जन प्रतिपादी । चंडदीधितिवंतातें ॥३८॥प्रभाते म्हणती कोंवळा सूर्य । मध्याह्रनकाळीं दाहक होय । सायाह्नीं तत्किरण निचय । क्षीण झाला जन म्हणती ॥३९॥हाही अर्थ असो परता । तुज परिपूर्ण श्रीभगवंता । आज्ञापकता आणि धारकता । असो योग्यता द्विविधही ॥४०॥दोहीं योगें तेजोहानि । तुझी न घडे चक्रपाणि । यास्तव कृपेच्या अवलंबनीं । स्वामिसेवकीं अभेद ॥४१॥म्हणोनि अघटितघटनापटी । कृपेक्षणें पावे पुष्टी । लीलालास्यें दावी सृष्टी । तुज ते शेवटीं अस्पृष्ट ॥४२॥मी परमेश्वर सर्ववंद्य । दास्यकर्म मज अयोग्य निन्द्य । ऐसा तुजमाजि न वसे भेद । तरी तें विशद अवधारीं ॥४३॥न वै तेऽजित भक्तानां ममाहमिति माधव । त्वं तवेत च नानाधीः पशूनामिव वैकृता ॥५॥तव भक्त जे सप्रेमळ । अनन्यबोधात्मक केवळ । अहंताममतामय जो मळ । त्यापें अळुमाळ न वसे पैं ॥४४॥अहंता ममता त्वंता तवता । इत्यादिभेदबोधात्मकता । पशुत्वें यथार्थ जैसी भ्रान्ता । तेंवि भगवंता न तावकां ॥४५॥तावकांप्रति हे भेदबुद्धि । तव सान्निध्यें जेथ न बधी । मा माधवा तूतें बाधी । हें न घडे कधीं पशुसाम्यें ॥४६॥पशु हें नाम कोणाप्रति । ऐसें पुससी जरी श्रीपति । तेंही कथितों यथामति । प्रकृतिविकृतिसमुच्चयें ॥४७॥भो भो अजिता अज अव्यया । अष्टधाप्रकृत स्थूळमाया । विकृता जीवरूपा जिया । आणिलें आया भवस्वप्न ॥४८॥एकें अनेकता दावून । मी माझें हें दृढावून । तूं तुझें हें तत्प्रतिभान । केलें स्वप्न सुप्तातें ॥४९॥अविद्यावरणात्मक जो देह । आत्मविसरें अप्रत्यय । ज्यातें म्हणती कारणदेह । जेथूनि उदय स्वप्नाचा ॥५०॥स्वप्नभ्रमें भ्रमले भ्रान्त । देहात्मबोधें विषयग्रस्त । तुझें माझें करिती नित्य । केवळ प्राकृत पशू प्राणी ॥५१॥देहाहंता ते तव भक्तां । नाकळी ममता त्वंता तवता । कारणदेहाचिया ध्वान्ता । लंघूनि तत्वता जे गेले ॥५२॥प्रत्यगात्मत्वचित्प्रकाश । जेणें अवगमे विश्वाभास । आश्रय सर्वसाक्षी त्यास । तोही निःशेष जिंहीं केला ॥५३॥तादात्म्यबोधें स्वरूपनिष्ठ । होऊनि झाले समरसाविष्ट । अनेकतेचे विसरून कष्ट । झाले भ्राजिष्ठ पूर्णत्वें ॥५४॥त्या जे न शिवे अनेकता । तूं तो माधव मायानियंता । तुझ्या ठायीं अहंता ममता । पशुसाम्यता केंवि घडे ॥५५॥इत्यादिवचनें गरुडध्वजा । सप्रेमभावें धर्मराजा । प्रार्थूनि यज्ञारंभकाजा । यज्ञ करिता जाहला ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP