मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक १० ते १५ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक १० ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १० ते १५ Translation - भाषांतर उपहूतास्तथा चान्ये द्रोणभीष्मकृपादयः । धृतराष्ट्रः सहसुतो विदुरश्च महामतिः ॥१०॥ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्रा यज्ञदिदृक्षवः । तत्रेयुः सर्वराजानो राज्ञां प्रकृतयो नृप ॥११॥धर्मराजें स्वमुखें वचनीं । नकुळाप्रति आज्ञापूनी । गजसाह्वया पाठवूनी । कौरवांलागोनी आणविलें ॥८७॥ भीष्म द्रोण कृपाचार्य । प्रज्ञाचक्षु सशततनय । त्रिकाळज्ञ विदुर आर्य । आर्यांवर्य वक्तृत्वें ॥८८॥यालागीं महामति ऐसें । श्लोकीं विशेषण दिधलें असे । आदिपदाच्या सौरसें । अशेष कौरव सूचिले ॥८९॥कर्ण शकुनि जयद्रथ । बाहूलीक भूरिश्रवा सोमदत्त । अश्वत्थामा शल्य सुरथ । नकुळें समस्त आणिले ॥९०॥सहदेवातें युधिष्ठ्रें । आज्ञापितां दूर येरें । प्रेरूनि राजे अत्यादरें । यज्ञमंडपा प्रार्थिले ॥९१॥पूर्वीं दिग्व्जयाचे काळीं । भूभुजांतें आज्ञा केली । दूतसंकेतें वंदूनि मौळी । आली मंडळी नृपांची ॥९२॥बार्हद्रथें जिंकूनि रणीं । रोधिल्या होत्या नृपांच्या श्रेणी । त्या सोडितां मागधमरणीं । आज्ञा केली श्रीकृष्णें ॥९३॥ते आज्ञेतें स्मरोनि हृदयीं । राजे मिनले मखालयीं । चातुर्वण्य सहसमुदायीं । आले तेंही अवधारा ॥९४॥श्रेष्ठ ब्राह्मण चतुर्वेदी । सहित शिष्योपशिष्यमांदी । शास्त्राध्यायी दर्शनवादी । मीमांसकादि पातले ॥९५॥तैसींच समस्त क्षत्रियकुळें । परमस्वधर्मशीळें अमळें । धर्मराजाचे यज्ञाशाळे । पाहों आलीं सप्रेमें ॥९६॥वैश्य सदाचारसंपन्न । धनाढ्य अपर जे वैश्रवण । धर्मराजाचा पहावया यज्ञ । आले संपूर्ण सद्भावें ॥९७॥तैसेचि शूद्र आस्थावंत । द्विजपरिचर्याविषयीं निरत । धर्मराजाचा मख समस्त । पहावयार्थ पातले ॥९८॥अष्टधा नृपांचिया प्रकृती । यज्ञ पहावयाचे आर्ती । पातल्या नृपांचिये संगती । न लगे पुनरुक्ति करावी ॥९९॥ऐसे मंडपीं चार्ही वर्ण । अपार मिनले भूभुजगण । द्विजीं शोधिलें देवयजन । तें व्याख्यान अवधारा ॥१००॥ततस्ते देवयजनं ब्राह्मणाः स्वर्णलाङ्गलैः । कृष्ट्वा तत्र यथाम्नायं दीक्षया्ञ्चक्रिरे नृपम् ॥१२॥ब्राह्मणीं यथोक्त यज्ञकर्मा । भू याचिजे नृपोत्तमा । धर्मराजें यज्ञकामा । कैसी क्षमा स्वीकारिली ॥१॥परशुरामें ब्राह्मणांप्रति । दान केली अवघी क्षिति । धर्में ब्राह्मणांपासूनि पुढती । कवणे रीती प्रार्थियली ॥२॥आधुनिक राजे झाले क्षत्री । प्राचीन ब्राह्मणांची धरित्री । त्यांपासूनि परिमितसूत्रीं । यज्ञायतना पुरे ऐसी ॥३॥सूत्रमानें भू मोजिली । स्वर्णनिष्कीं आच्छादिली । तन्निष्कदानें ते स्वीकेली । मग शोधिली यथाविधिं ॥४॥देवयजन तें यज्ञभूमी । लांब रुंद यथानियमीं । ब्राह्मणीं आकृष्ट लाङ्गलीं हैमीं । यज्ञवित्तमीं विलोकुनी ॥१०५॥काच खर्परें अस्थिशकलें । प्रतिमा अवयवादि भंगले । इटा लोष्ठ दुर्दुममूळें । काढूनि केली भूशुद्धि ॥६॥भूमि शोधूनि यज्ञायतनें । वेदि निर्मिली सूत्रज्ञानें । धर्मराजातें वेदविधानें । दीक्षा करिते जाहले ॥७॥दीक्षाङ्गसंस्कार समस्त । तिहीं करूनि संसारयुक्त । करिते जाहले द्विज समर्थ । युधिष्ठिरातें ते काळीं ॥८॥हैमाः किलोपकरणा वरुणस्य यथा पुरा । समस्त यज्ञांचीं उपकरणें । निर्मिलीं जाम्बूनदसुवर्णें । जैसीं पूर्वीं केली वरुणें । स्वमखाकारणें स्वभुवनीं ॥९॥म्हणाल वरुण तो दिक्पाल । धर्म मानवी भूपाळ । ऐसें नव्हे हे पाण्डव सकळ । अमर केवळ अवतरले ॥११०॥म्हणोनि हरिहरांच्या मूर्ति । आल्या युधिष्ठिरमखाप्रति । ते हे ऐका शुकभारती । शंका चित्तीं न धरूनियां ॥११॥इन्द्रादयो लोकपाला विरञ्चिभवसंयुताः । सगणाः सिद्धगंधर्वा विद्याधरमहोरगाः ॥१३॥मुनयो यक्षरक्षांसि खगकिन्नरचारणाः । राजानश्च समाहूता राजपत्न्यश्च सर्वशः ॥१४॥राजसूयं समीयुः स्म राज्ञः पांडुसुतस्य वै । मेनिरे कृतभक्तस्य सूपपन्नमविस्मिताः ॥१५॥इंद्राग्नि यम निरृति । वरुण वायु कुबेर पशुपति । ब्रह्मादि निर्जर सहसंपत्ति । आले निगुती धर्ममखा ॥१२॥गण गंधर्व सिद्ध चारण । उरग यक्ष रक्षोगण । खग मुनि किन्नर विद्याभरण । आले पूर्ण मख लक्षूं ॥१३॥आज्ञापत्रें भूभुज सर्व । पाहूं आले मख अपूर्व । पत्न्या पुत्र सेनाविभव । घेऊन मखार्ह संभार ॥१४॥पाण्डुसुत जो धर्मराज । तयाचा यज्ञ सुकृतपुंञ्ज । पाहों आले सर्व भूभुज । मानिती चोज विलोकनीं ॥११५॥म्हणती कृष्णभक्ताचा अध्वर । म्हणोनि सिद्धी पावला सधर । येरव्हीं विघ्नें धुरंधर । जिणोनि पार कोण पावे ॥१६॥ऐसे विस्मित भूपाळ । अमरेंसहित अमरपाळ । विरंचिसहित जाश्वनीळ । मानिती केवळ कृष्णकृपा ॥१७॥ऐसी संभारसमृद्धि । देखोनि ऋत्विज यथाविधि । आसादनी करूनि आधीं । योजिते झाले तें ऐका ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP