मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७१ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ७१ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर एवं सुहृद्भिः पर्यस्तः पुण्यश्लोकशिखामणिः । संस्तूयमानो भगवान्विवेशालंकृतं पुरम् ॥३१॥ऐसिया प्रकारें सूहृदस्वजनीं । परिवेष्टित चक्रपाणी । पुण्द्यश्लोकांचा मुकुटमणी । नानास्तवनीं स्तविताती ॥६९॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो परमात्मा जनार्दन । सालंकृत धर्मपत्तन । प्रवेशला सैन्येंसीं ॥२७०॥सालंकृत म्हणाल कसें । शुकें वर्णिलें समासें । भाषाव्याख्यानही तैसें । श्रोतीं अल्पसे परिसावें ॥७१॥संसिक्तवर्त्म करिणां मदगंधतोयैश्चित्रध्वजैः कनकतोरणपूर्णकुंभैः ।मृष्टात्मभिर्नवदुकूलव्भूषणस्रग्गंधैर्नृभिर्युवतिभिश्च विराजमानम् ॥३२॥दों श्लोकीं तें पुर शोभन । सालंकृत कीजे श्रवण । जेथ प्रवेशतां भगवान । पाहे संपूर्ण पुरलक्ष्मी ॥७२॥मत्त गजांचें दानोदक । गंधाथिले उन्मादक । केशर कस्तूरी चंदनपंक । तिहीं सम्यक पथ सिक्त ॥७३॥विचित्रवसनध्वजांच्या श्रेणी । उच्च उज्ज्वल शोभती गगनीं । समुक्त तोरणें कनकपर्णीं । द्वारीं गोपुरीं सर्वत्र ॥७४॥कनककुंभाम्भपूर्ण द्वारीं । उभय भागीं वृद्धाचारीं । तिहीं करूनि कुरुनृपनगरी । अमरपुरश्री लाजवी ॥२७५॥उद्वर्तनाभ्यक्त स्नात । दिव्य वसनें परिवेष्टित । विचित्र ललामपुरटघटित । सालंकृत नरनारी ॥७६॥सहज विचरतां कुरुवरपुरीं । गमती निर्ज्जर सह अप्सरी । गंधकुंकुमीं प्रसूनहारी । दिसे साजिरी पुरशोभा ॥७७॥उद्दीप्तदीपबलिभिः प्रतिस्द्मजालनिर्यातधूपरुचिरं विलसत्पाताकम् । मूर्द्धन्यहैमकलशै रजतोरुशृंगैर्जुष्टं ददर्श भवनैः कुरुराजधाम ॥३३॥ राजमार्गाच्या उभयप्रांतीं । सदनराजी विराजती । पूर्णकनककलशपंक्ती । वरी दीप शोभती प्रज्वलित ॥७८॥पुष्पें फळें पल्लव दधी । साक्षतसदीप मंगळव्धी । वृद्धाचार कल्याणवृद्धी । कुरुपुरऋद्धिं हरि पाहे ॥७९॥प्रासादगर्भीं दामोदरीं । गवाक्षमार्गीं जालरंध्रीं । दशांग जळतां धूम्रपिंजरीं । निघे वाहेरी मघमघित ॥२८०॥धूम्रपिंजरी गगनगामी । चैलपताका झळकती व्योमीं । तेणें कुरुवरपुरींची लक्ष्मी । अमरसद्मीं असाभ्य ॥८१॥रजतश्रृंगें प्रसादशिखरीं । हेमकलशांच्या त्यांवरी हारी । वैदूर्यमणी भास्करापरी । कलशमूर्ध्निस्थ प्रकाशती ॥८२॥इत्यादि अनेकशोभाजुष्टें । भुवनें विराजती घनदाटें । पद्मासनें रविकरस्पृष्टें । श्रीवैकुंठें विलोकिलीं ॥८३॥तैसी अनेक श्रीमद्भवनीं । मंडित कुरुवरराजधानी । पहाता झाला चक्रपाणी । सहज कुमुदिनी सरेंदुवत् ॥८४॥असो ऐशी पुरप्रवेशीं । धर्मभवनींची हृषीकेशी । साकल्य शोभा ससैन्येंसीं । पाहोनि मानसीं आह्लादें ॥२८५॥पुरीं प्रवेशला श्रीपती । ऐकोनि पुरवनितांच्या चित्तीं । निसर्गोंत्साह चापल्य प्रीती । ते व्युत्पत्ति अवधारा ॥८६॥प्राप्तं निशम्य नरलोचनपानपात्रमौत्सुक्यविश्लथितकेशदुकूलबंधाः । सद्यो विसृज्य गृहकर्मपतींश्च तल्पे द्रष्टुं ययुर्युवतयः स्म नरेंद्र मार्गे ॥३४॥सर्वां योनींमाजि सार । नरदेह जो कां पुण्यप्रचुर । त्याहीमाजि सभ्याग्यनर । सुकृती सुंदरतर पाहती ॥८७॥श्रवणेंद्रियासी श्राव्यामृत । हरिगुणकीर्तन विबुधप्रणीत । तेंवि नेत्रेन्द्रियासी रुचिरामृत । उत्कट मन्मथसौंदर्य ॥८८॥ऐशा अनेक मन्मथकोटी । लोपती ज्याचिये कटाक्षदृष्टी । लावण्यरससिंधु ये सृष्टी । तो जगजेठी श्रीकृष्ण ॥८९॥केवळ कृष्णमूर्ति तें भाजन । लावण्यरसें भरलें पूर्ण । अगाध सुकृती जे जे जन । नयनीं पान ते करिती ॥२९०॥ऐसें कृष्णाचें लावण्य । दुर्लभ म्हणोनि होतें श्रवण । नगरीं आला हें ऐकोन । उत्सुक संपूर्ण नरनारी ॥९१॥जो नरलोचना पानपात्र । लावण्यरसपानें नरनेत्र । न धाती तेथ नारीगात्र । विह्वळतर किती म्हणिजे ॥९२॥ सादर पहावया श्रीरंग । प्रेमविह्वळ वनितावर्ग । विस्मृत देहगेहप्रवृत्तिमार्ग । निघती सवेग विवशत्वें ॥९३॥विसरीं विसर्जिलीं गृहकृत्यें । त्यजिलीं स्तनपानीं अपत्यें । विस्मृत भूषणें अस्ताव्यस्तें । हरी स्मृतीतें हरिस्मरणें ॥९४॥सद्य म्हणिजे तेच क्षणीं । कृष्ण पहावया निज ईक्षणीं । मंचकीं स्वपती सांडूनि शयनीं । सवेग कामिनी धांविनल्या ॥२९५॥धांवतां सुटले केशपाश । श्लथित नीवी विगलित वास । स्वजनत्रपेचा झाला ह्रास । राजमार्गास वधू आल्या ॥९६॥ज्यांचें पदनख जनांचे नयनीं । न दिसे ऐशा निगूढ सदनीं । त्या धांवती श्लथितां वसनीं । कृष्णागमनीं पुरवनिता ॥९७॥भो परीक्षिती कुरुनरेन्द्रा । येतां लावण्यरससमुद्रा । प्राशावया तन्मुखचंद्रा । नयनचकोरां उल्लास ॥९८॥ऐशा धांवती विगतस्मृति । तमिस्रा भीकर हें न म्हणती । पुढें जाऊनि काय करिती । तें कुरुनृपती अवधारीं ॥९९॥तस्मिन्सुसंकुल इभाश्वरथद्विपद्भिः कृष्णं सभार्यमुपलभ्य गृहाधिरूढाः ।नार्यो विकीर्य कुसुमैर्मनसोपगुह्य सुस्वागतं विदधुरुत्स्मयवीक्षितेन ॥३५॥सुतराम् म्हणिजे बरवेपरी । तया मार्गाचे ठायीं हरी । संकूल इभाश्वनररहंवरीं । नलभती नारी रीघ तेथें ॥३००॥मग वेधल्या दामोदरीं । पथोपभागीं दोहीं हारी । वळघल्या मादिया गोपुरीं । पाहती सुंदरी कृष्णातें ॥१॥मागें पुढें जनपदभार । रथाश्वपदातिं कुंजर । भार्यापुत्रेंसीं यदुवीर । प्राशिती सादर तृषिताक्षी ॥२॥नारीनयनकुमुदें ऊर्ध्व । हरिमुखचंद्रमा देखती अध । विपरीत अळंकारोक्तिबोध । अळंकारकोविद अनुभविती ॥३॥ललना हरिमुख पाहोनि दृष्टी । सप्रेम करिती प्रसूनवृष्टि । मनोबाहीं लावण्यमुकुटीं । तो जगजेठी आलिंगिती ॥४॥पथश्रमांचिये परिहारीं । स्वागतप्रश्न कीजे चतुरीं । तो तेथ करूं न शकती नारी । वदनीं स्मेरीं त्या करिती ॥३०५॥मंदस्मेराननीं नयनीं । सप्रेम अपांगईक्षणीं । सभार्य लक्षूनि चक्रपाणी । स्वागतप्रश्नीं अवगमिती ॥६॥ऐसा लक्षूनि चक्रपाणी । पुरजनवनिता अंतःकरणीं । अनुमानिती तें तूं श्रवणीं । कुरुकुळतरणी अवधारीं ॥७॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP