मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६९ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६९ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर अव्यक्तलिंगं प्रकृतिष्वंतःपुरगृहादिषु । क्वचिच्चरंतं योगेशं तत्तद्भावबुभुत्सया ॥३६॥अंतःपुरगृहाच्या ठायीं । आपुल्याप्रकृतींमाजी पाहीं । वेषान्तरें शेषशायी । गूढरूपें विचरतसे ॥३२५॥त्याचे ते ते अंतर्भाव । जाणूं इच्छूनि श्रीकेशव । वेषान्तरें निज अवयव । लपवूनि विचरे गूढत्वें ॥२६॥अथवा अंतःपुरगत ललना । त्यांच्या जाणोनि भोगभावना । तद्भोगइच्छेकरूनि जाणा । अव्यक्तलिंगें हरि विचरे ॥२७॥म्हणाल भोगवासना कैशा । हरि केंवि लपवी आकृतिठसा । यदर्थीं आश्चर्य न मना सहसा । नव्हे योगीशा दुर्घट हें ॥२८॥यालागीं योगीश्वराच्या ठायीं । अघटितघटना दुर्घट नाहीं । ऐसें जाणोनि शंका हृदयीं । श्रोतीं कांहीं न धरावी ॥२९॥योगमायेच्या नटनाट्यें । लीले विचरतां वैकुंठपीठें । नारद जाणोनि आत्मनिष्ठे । प्रकट भेटे तें ऐका ॥३३०॥अथोवाच हृषीकेशं नारदः प्रहसन्निव । योग्मायोदयं वीक्ष्य मानुषीमीयुषो गतिम् ॥३७॥समस्त सदनें फिरल्यावरी । नारद जाऊनि भेटे हरी । मग हरीतें मधुरोत्तरीं । बोले वैखरी स्मितवक्त्रें ॥३१॥प्रकर्षें हांसतियांचे परी । हृषीकेशातें निजवैखरी । योगमायेचा उदय नेत्रीं । वेदनिर्धारीं लक्षूनि ॥३२॥मनुष्याची जैसी गति । तियेतें अनुसरे जो श्रीपति । त्यासी नारद निष्कपटोक्ति । बोले निश्चिती तें ऐका ॥३३॥विदाम योगमायास्ते दुर्दर्शा अपि योगिनाम् । योगेश्वरात्मन्निर्भाता भवत्पादनिषेवया ॥३८॥नारद म्हणे भो योगीश्वरा । जाणोनि तव मायाविचारा । जे दुर्दर्श योगियां अपरां । त्या निर्धारा अवधारीं ॥३४॥अशक्य दावावयाकारणें । अपर योगियांलागिं जें म्हणे । ते तव माया अंतःकरणें । जाणों आम्ही तव कृपा ॥३३५॥अगा ये आत्मया श्रीहरि । आमुचे मानसीं प्रतीति खरी । तुझी माया हे निर्धारीं । स्वरूपाधारीं भासतसे ॥३६॥तुझिया पादसेवनेंकरून । आम्ही तव मायाभिज्ञ । येर्हवीं योगियांलागून । दुःखेंकरून न देखवे ॥३७॥षोडशसहस्रसदनान्तरीं । साष्टशतादि वरिष्ठां घरीं । विराजलासि पृथगाचारीं । म्यां निर्धारीं लक्षिलासी ॥३८॥हे तव अवघी योगमाया । योगेश्वरांही न ये आया । प्रतीत बाणली आमुच्या हृदया । अभेदें तुझिया पदभजनें ॥३९॥मनुष्यनाट्याची पाहिली लीला । हे तव माया श्रीघननीळा । वास्तवपरमार्थतत्त्वजिह्वाळा । नोहे गोपाळा मी जाणें ॥३४०॥तुझिया मनुष्यनाट्येंकरून । मोहें भ्रमले विधि ईशान । इंद्र अग्नि यम निरृति वरुण । कुबेर पवनप्रमुख सुर ॥४१॥मनुष्यनाट्येंकरूनि तुझिया । झणें मोहिसी माझिया हृदया । या कारणास्तव शरण पाया । जे देऊनि अभया आज्ञापीं ॥४२॥अनुजानीहि मां देव लोकांस्ते यशसाप्लुतान् । पर्यटामि तवोद्गायन्लीलां भुवनपावनाम् ॥३९॥क्रुपा करूनि आज्ञा देयीं । म्हणसी जासील कोण ठायीं । तरी सर्वगा त्वां हें जाणिजे हृदयीं । तव यशनवाईगतदेशा ॥४३॥मातें जाणिजे त्वां देवा । तव यशोमंडितां लोकां सर्वां । तव कीर्ति मी गात फिरेन बरवा । श्रीकेशवा हृदयस्था ॥४४॥भुवनपावनी जे तव लीला । उच्चस्वरें भुवनपाळा । गात होत्साता लोकां सकळां । पर्यंटन मी करीन ॥३४५॥यदर्थी तुवां कृपा कीजे । मायामोहें न मोहिजे । लीलागायनीं प्रमोदिजे । अभीष्ट माझें हें पुरवीं ॥४६॥हें ऐकोनि श्रीभगवान । भ्रमभयाकुळ नारद शरण । जाणोनि अभयद बोले वचन । करुणापूर्ण तें ऐका ॥४७॥श्रीभगवानुवाच - तच्छिक्षयँल्लोकमिममास्थितः पुत्र मा खिदः ।ब्रह्मन्धर्मस्य वक्ताऽहं कर्ता तदनुमोदिता ॥४०॥अरे ब्राह्मणा ब्रह्मनंदना । सवर्था खेद न करीं मना । ऐकोनि साकल्य ममाचरणा । समाधाना अवलंबीं ॥४८॥मी धर्माचा संस्थापक । वक्ता कर्ता अनुमोदक । धर्मसन्मार्गीं शिक्षीं लोक । म्हणोनि सम्यक आचरें पैं ॥४९॥मी आचरोनि शिक्षीं लोकां । जाणोनि ऐशिया विवेका । खेद न कीजे त्वां पुत्रका । अखिल लोकामाजी रमतां ॥३५०॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP