मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर लांगलाग्रेण नारमुद्विदार्य गजव्हयम् । विचकर्ष स गंआयां पहरिष्यन्नमर्षितः ॥४१॥दक्षिणभगींचे प्रचंड वप्र । भेदिले करूनि हळप्रहार । तेणें उचलिलें हस्तिनापुर । द्रोणगिरिवर कपि जैसा ॥८२॥पयोधिमथनीं मंदराचळ । तैसें हस्तिनापुरीचें चडळ । हलें उचलिता झाला बळ । न्युब्ज केवळ करावया ॥८३॥पालथें घाला हस्तिनापुर । ऐसें बोलिला यादवेश्वर । मी नृपाचा आज्ञाधर । करीन साचार नृपाज्ञा ॥८४॥उलथून पालथें गंगेमाजी । हस्तिनापूर घालीन आजी । नांगरें उत्पतितां सहजीं । पुर गजबजी हाहाकारें ॥२८५॥माड्या गोपुरें लक्षकोडी । पडलीं भू होतां कानवडी । सदनीं गडबडिल्या उतरडी । पुरी हडबडी एकसरें ॥८६॥बोंबा मारिती नारीनर । म्हणती मातले कौरव फार । त्यांचा करावया संहार । आज हलधर क्षोभला ॥८७॥नगरीं झाला हाहाकार । शंख करिती लहान थोर । कौरवसंगें जन समग्र । आजि संहार पावेल ॥८८॥बळें उचलितां हस्तिनापुर । कोण्या प्रकारें झालें वक्र । कौरवांचा कोण प्रकार । तो साचार अवधारा ॥८९॥जलयानमिवाघूर्णं गंगायां नगरं पतत् । आकृष्यमाणमालोक्य कौरवा जातसंभ्रमाः ॥४२॥जैसी नौका पालथी होये । गंगेमाजी तेणें न्यायें । हस्तिनापुर कलथों पाहे । म्हणती प्रळय वोढवला ॥२९०॥गंगेमाजी अकस्मात । न्युब्ज होतां नगरपात । कौरव घाबरले समस्त । करिती आकांत प्राणभयें ॥९१॥सर्वही करिती हाहाकार । एक सवेग वेंधले वप्र । एक पळाले सांडूनि पुर । कुटुंबें समग्र घेऊनी ॥९२॥एकीं आणिला समाचार । कौरवीं अपमानिला बळभद्र । क्षोभला जैसा प्रळयरुद्र । नांगरें नगर उचटीतसे ॥९३॥ऐकूनि भीष्मद्रोणादि म्हणती । कौरव मातले हे दुर्मति । कां क्षोभविला रेवतीपति । कोण आकान्तीं रक्षील या ॥९४॥पालथी घालूं शके धरा । तया क्षोभविलें हलधरा । आतां रडती रांडा पोरा । मृत्यु अवसरा वरपडती ॥२९५॥तमेव शरणं जग्मुः सकुटुम्बा जिजीषिवः । सलक्ष्मणं पुरस्कृत्य साम्बं प्राञ्जलयः प्रभुम् ॥४३॥जीव वांचवावयाची आशा । घेऊनि कुटुंबा अशेषा । कींव भाकिती द्वारकाधीशा । म्हणती दासां रक्षावें ॥९६॥त्या रामातें जाऊनि शरण । कुटुंबेंसहित वंदिती चरण । म्हणती आमुचे रक्षीं प्राण । होईं सघृण दयाळुवा ॥९७॥कुटुंबेंसहित कौरवीं सकळीं । राम वंदूनि बद्धाञ्जळी । स्तविते झाले मुसळी हली । चंद्रमौळी जेंवि सुरीं ॥९८॥आदिकरूनि भीष्मद्रोण । सहित अंबिकानंदन । कृपाचार्य विदुर कर्ण । दुर्योधन सह बंधु ॥९९॥शकुनि भूरिश्रवा बाल्हिक । प्रजा प्रधान मुख्य मुख्य । वंदूनि रामाचे पदाङ्क । म्हणती सेवक संरक्षीं ॥३००॥केविलवाणीं करूनि तोंडें । एक रडती रामापुढें । एक दाविती मोडलीं हाडें । वरी भिंताडें पडोनियां ॥१॥एक म्हणती संपदा सकळी । क्षणामाजी मिळाल्या धुळी । कौरवीं दुष्टीं हेळिला हली । आम्ही वेगळीं निरागसें ॥२॥वणव्यामाजी जंतु जळती । तैसी आम्हां झाली गति । चरणाङ्गुष्ठ दांतीं धरिती । रक्षीं यदुपति निजशरणां ॥३॥भीष्मदिक करिती स्तवन । वंदूनि बळरामाचे चरण । करविती अपराधक्षमापन । तें आख्यान अवधारा ॥४॥राम रामाखिलाधार प्रभावं न विदाम ते । मूढानां नः कुबुद्धीनां क्षंतुमर्हस्यतिक्रमम् ॥४४॥जय जय रामा कल्याणधामा । लोकत्रयाच्या विश्रामा । अखिलाधारा पुरुषोत्तमा । रक्षीं आम्हां कृतागसां ॥३०५॥तुझा प्रभाव आम्हां न कळे । मूर्ख नृपमदें आंधळे । विषयभ्रमें घूर्णित डोळे । शरीरबळें उन्मत्त ॥६॥आम्ही कुबुद्धि कुटिल खळ । तूं परमात्मा त्रैलोक्यपाळ । अपराध क्षमा करूनि सकळ । होईं कृपाळ बळरामा ॥७॥धरणीधर तूं संकर्षण । धरणीआंगीं सोढव्य पूर्ण । तुझिये सतेचा तो गुण । क्षमस्वी पूर्ण तूं रामा ॥८॥शरणागता वज्रपंजर । हा तव बिरुदाचा बडिवार । कौरव कृतागस पामर । रक्षूनि साचार बिरुद करीं ॥९॥जिहीं निन्दा केली तोडें । ते हे खालती करिती मुण्डें । कींव भाकिती प्राणचाडे । काय हें थोडें यश लोकीं ॥३१०॥ कुटुंबेंसहित लोटाङ्गणीं । कौरव निन्दक लागले चरणीं । हें यश मिरवीं हिमकर तरणि । जंववर गगनीं भ्रमती तों ॥११॥ऐसा हलधर भीष्मप्रमुखीं । स्तवितां सस्मित बोले मुखीं । पादत्राण कुरुमस्तकीं । केंवि भूलोकीं मिरवेल ॥१२॥कौरवदत्तभूखंडभाजी । वृष्णि वरिष्ठ झाले आजी । नृपचिह्नेंसी राजसमाजीं । भूभुजपुंजीं विराजले ॥१३॥ऐसें बोलतां संकर्षण । भीष्मप्रमुखीं धरिले चरण । म्हणती दुष्टांचें भाषण । न करीं स्मरण याउपरी ॥१४॥गंगेमाजी पडती समळ । गंगा त्यांतें करूनि अमळ । निर्मळ आहे सर्वकाळ । तेंवि हें कुटिळ विसरावें ॥३१५॥साम्बनिग्रहण ऐकोन । क्षोभला राजा उग्रसेन । आमुचें इच्छूनि क्षेमकल्याण । त्वां त्यालागून शान्तविलें ॥१६॥तूं आलासी स्नेहकामा । परि तें न कळे कौरवाधमां । कृतापराध करूनि क्षमा । रक्षीं आम्हां निजशरणां ॥१७॥ऐसें स्तविती नाना परी । ससाम्ब लक्ष्मणा नोवरी । पुरस्करूनि ते अवसरीं । प्रलंबारी प्रार्थिंती ते ॥१८॥स्थित्युत्पत्त्यप्ययानां त्वमेको हेतुर्निराश्रयः । लोकान्क्रीडनकानीश क्रीडतस्ते वदंति हि ॥४५॥सर्वीं जोडूनि अंजलिपुट । घडघडां करिती स्तोत्रपाठ । केवळ संकर्षणाचे भाट । करिती बोभाट बिरुदांचा ॥१९॥म्हणती उत्पत्ति स्थिति प्रळय । देवत्रयाचें कर्म त्रितय । तयां त्रिगुणां तूं आश्रय । निर्गुण निराश्रय केवळ तूं ॥३२०॥पूवचैतन्य तूं ईश्वर । अखिल ब्रह्माण्ड चराचर । तुझी क्रीडा हे अजस्र । विविधाकार क्रीडनकें ॥२१॥तुझिये क्रीडेचीं बाहुलीं । विविध लोकें प्रतिष्ठिलीं । शक्रादि अभिमानें ठेविलीं । विविधा चाली चालवूनि ॥२२॥तुझा महिमा हा अव्यय । सर्वत्र प्रकटती अम्नाय । वाखाणिती मुनिसमुदाय । प्राकृता सोय तद्योगें ॥२३॥आम्ही पामरें प्राकृतें हीन । तूं परमात्मा संकर्षण । मुनिश्वर करिती श्रुतिव्याख्यान । भाग्यें श्रवण तैं होय ॥२४॥कैसें व्याख्यान मुनि करिती । जितुकें विदित आमुचे मति । तितुकें ऐकें अनंतमूर्ति । ऐसें प्रार्थिती कुरुवृद्ध ॥३२५॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP