मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर उग्रसेनः क्षितिरीशो यद्व आज्ञापयत्प्रभुः । तदव्यग्रधियः श्रुत्वा कुरुध्वं मा विलबितम् ॥२१॥म्हणे ऐका जी कौरवनाथा । विषादरहित करूनि चित्ता । आज्ञा नृपाची जे तत्त्वता । ते मी आतां निरूपितों ॥६४॥उग्रसेन क्षितीचा ईश । जेणें पाळिला यदूचा वंश । आज्ञाधारक हृषीकेश । प्रभुत्वें शक्रास जो न गणी ॥१६५॥तेणें आज्ञा तुम्हांसि केली । ते अव्यग्रबुद्धी ऐकिजे सकळीं । सर्वीं राहोनि आज्ञेतळीं । पाहिजे केली वर्तणुक ॥६६॥विलंब न करावा येविषयीं । माझा स्नेह तुमच्या ठायीं । म्हणोनि आलों मी लवलाहीं । आज्ञा कायी ते ऐका ॥६७॥यद्यूयं बहवस्त्वेकं जित्वाऽधर्मेण धार्मिकम् । अबध्नीताथ तन्मृष्ये बंधूनामैक्यकाम्यया ॥२२॥द्वारकेमाजी सभास्थानीं । नृपासन्निध यादववृष्णि । बैसले असतां नारदें श्रवणीं । वार्ता येऊनि निवेदिली ॥६८॥नारद म्हणे हस्तिनापुरीं । सुयोधनतनया स्वयंवरीं । साम्बें हरूनि ते नोवरी । निज रहंवरीं वाहिली ॥६९॥द्वारके आणितां पवनगती । भूभुज गेले स्वदेशाप्रति । कौरव धाविन्नले महारथी । तिंहीं तो पथीं पडखळिला ॥१७०॥साम्बें तयांसीं कीलं रण । अपार मारिलें कौरवसैन्य । भीष्मप्रमुख साहे जण । समराङ्गणीं तोषविले ॥७१॥साही जणांसी केलें विरथ । सैन्या दाविला मृत्युपथ । कौरवीं करूनि अधर्म तेथ । भंगिला रथ साम्बाचा ॥७२॥युगपत क्षोभले साही वीर । चौघीं मारिले चार्ही वारु । एकें सारथियाचें शिर । चाप कठोर पैं एकेम ॥७३॥साम्ब विरथ येतां धरणीं । मिठ्या घालूनि साही जणीं । धरूनि बांधिला समराङ्गणीं । अन्यायकरणी हे केली ॥७४॥ऐसें ऐकूनि नारदवचन । आवेशले यदुनंदन । त्यांसी वारूनि उग्रसेन । आज्ञाशासन पाठविलें ॥१७५॥तुम्ही बहुत साम्ब एकला । विरथ निःशस्त्र धार्मिक भला । अधर्मयुद्धें आकळिला । यास्तव घडला दोष तुम्हां ॥७६॥मूर्छित यानविवर्जित । अनवधान शस्त्ररहित । आणिकासम्मुख कीं दुश्चित्त । एकी बहुत अधर्म हे ॥७७॥इतुके अधर्म घडले तुम्हां । असो आम्हीं ते केले क्षमा । विरोघ न घडावा तुम्हां आम्हां । सुहृदगरिमा लक्षूनी ॥७८॥आम्ही तुम्ही सुहृद बन्धु । न व्हावा उभयांमाजी विरोधु । ऐसा लक्षूनि स्नेहवादु । क्षमिला क्रोधु ये विषयीं ॥७९॥आतां कीजे स्नेहवर्धन । प्रेमें वंदूनि संकर्षण । शीघ्र वधूवरें घेऊन । यावें बोळवणे प्रसंगें ॥१८०॥सौहार्द वाढविजे पहिलें । वृथा कलहें जें डहुळलें । आम्हीं सर्वही क्षमा केलें । आज्ञापिलें स्वीकरणें ॥८१॥ऐसें बोलतां संकर्षण । कौरव क्षोभले होतां श्रवण । वदती आपणांमाजी आपण । श्रोतीं श्रवण तें कीजे ॥८२॥वीर्यशौर्यबलोन्नद्धमात्मशक्तिसमं वचः । कुरवो बलदेवस्य निशम्योचुः प्रकोपिताः ॥२३॥वीर्य शौर्य आणि बळ । इहीं करूनि उच्छृंखळ । जे न गनिती कृतान्तकाळ । अमोघ शीळ जयांचें ॥८३॥आपुले शक्तिसमान वचन । स्वयें बोलिला संकर्षण । कौरव कोपले तें ऐकून । करिती हेळण दुर्वचनें ॥८४॥अहो महच्चित्रमिदं कालगत्या दुरत्यया । आरुरुक्षत्युपानद्वै शिरो मुकुटसेवितम् ॥२४॥करूनि यदुकुळाचें हेळण । कौरव आपणामाजी आपण । संकर्षणा ऐकवण । करूनि वचनें बोलती ॥१८५॥अहो शब्दें महाखेद । म्हणती कटा हा प्रमाद । कालकलनेचा विनोद । आश्चर्य अगाध पहा हें ॥८६॥काळगति हे दुरत्यय । तेणें विचित्र केलें काय । पादरक्षा त्यजूनि पाय । आरूढों पाहे मस्तकीं ॥८७॥मुकुट मस्तका भूषण । मस्तक मुकुटा भूषितें स्थान । मुकुट लोटूनि पादत्राण । म्हणवी भूषण मुकुटाचें ॥८८॥पायींची वाहाण पायींच बरी । ते आजी बैसों धांवे शिरीं । काळगतीची विपरीत परी । जे आम्हां पामरीं आज्ञापिजे ॥८९॥यालागीं नीच दुरिल्या दोरें । पहिल्यापासूनि ठेवितां बरें । यादवें क्षुद्रें हीनें पामरें । आम्हीं अविचारें वाढविलीं ॥१९०॥एते यौनेन संबद्धाः सहशय्यासनाशनाः । वृष्णयस्तुल्यतां नीता अस्मद्दत्तनृपासनाः ॥२५॥पृथा वसुदेवाची बहिणी । दिधली कुंतिभोजा पोसणी । पाण्डुरायें ती केली राणी । पाणिग्रहणीं विध्युक्त ॥९१॥तिया सोयरिकेचिया पदरें । यादववृष्णि हे सोयरे । ऐश्वर्यदानें स्नेहादरें । आपणांसमान वाढविले ॥९२॥राजसभेचा सम्मान । यांसी देऊनि अभ्युत्थान । नृपानिकटी तुंगासन । देखोनि नृपगण वोळंगती ॥९३॥अन्नसंबंध एकपंक्ती । न विचारूनि यांची ज्ञाति । भोजनीं शयनीं क्रीडतां द्यूतीं । समान नृपति हे केले ॥९४॥ययातिशापें यादव हीन । आम्ही तैं सर्वही नाठवून । सुहृद्भावें स्नेहवर्धन । केले मान्य नृपवर्गीं ॥१९५॥आम्हीं स्थापिले नृपासनीं । अस्मद्दत्त भोगिती अवनि । कृतोपकार तो विसरोनी । भूभुजचिह्नीं विराजती ॥९६॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP