मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| आरंभ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥ अजय जय वीरश्रीवल्लभा । जय जगज्जनका पंकजनाभा । नमनें नाशक भवभ्रमकोंभा । वैराग्यलाभा लाभवुनी ॥१॥तव पदपंकजप्रणतिमात्रें । प्रज्ञाप्रकाश लाहूनि वक्त्रें । निमंत्रिलीं सद्गुणपात्रें । भगवच्चरित्रें परिसावया ॥२॥सप्तषष्टीपर्यंत कथा । शुकें कथिली कौरवनाथा । अष्टषष्टीमाजी आतां । वर्णीं तत्त्वता बळविजय ॥३॥कैसा विजय केला कोठें । ऐसा प्रश्न करणें घटे । तरी संक्षेपें श्रवणपुटें । सप्रेमनिष्ठें परिसावें ॥४॥सांबें दुर्योधनाची तनया । स्वयंवरीं हरिली पाहतां राया । कौरवीं जिंकूनि रोधिलें तया । हें यदुवर्या श्रुत झालें ॥५॥ऐकूनि यादव चढले क्षोभा । म्हणती कौरवगर्वकोंभा । खंडूनि समरीं काढूं शोभा । प्रकटूं प्रभा शौर्याची ॥६॥तयां वारूनि रेवतीरमण । करूं गेला स्नेहरक्षण । म्हणूनि नांगरें भेदिले वप्र । मग संपूर्ण क्षोभला ॥७॥पालथें घालीन हस्तिनापुर । म्हणूनि नांगरें भेदिले वप्र । चडळ उचटितां हाहाकार । झाला अपार पुरगर्भीं ॥८॥भीष्मप्रमुख कौरव सकळ । शरण होवूनि नमिती बळ । नेईं म्हणती स्नुषा बाळ । रक्षीं कुरुकुळ कृपाळुवा ॥९॥इतुकी कथा ये अध्यायीं । परीक्षितीच्या श्रवणालयीं । शुकें कथिली ते समयीं । आनंददायी सेवावी ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP