मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर चामरव्यजने शंखमातपत्रं च पांडुरम् । किरीटमासनं शय्यां भुंजत्यस्मदुपेक्षया ॥२६॥शरीरसंबंध सामान्यासी । उमजावया या न्यूनत्वासी । आपणांसमान यां नृपसभेसी । सम्मानेंसी मिरविलें ॥९७॥नृपसिंहासन तुंगातपत्रें । किरीटकुण्डलें युग्मचामरें । कंबुघोषें पांडुरच्छत्रें । दुंदुभिगजरें नृप झाले ॥९८॥राजयानें राजशयनें । राजपानें राजसम्मानें । धनें गोधनें भूभुजचिह्नें । ऐश्वर्यभूषणें मिरविती हे ॥९९॥आम्हांपुढें अपरच्छत्र । उभवी कोण मायेचा पुत्र । यादव सोयरे अस्वतंत्र । जाणूनि अन्यत्र न गणूं यां ॥२००॥राजचिह्नाचा आग्रह । आम्हीं न केला धरूनि स्नेह । तेणें मदगर्वाचा रोह । झाला पहा हो यां आंगीं ॥१॥आम्ही उपेक्षा करितां पाहीं । राजपदवी भोगिली इहीं । उपकार विसरूनियां सर्वही । धरिलें देहीं आढ्यत्व ॥२॥अलं यदूनां नरदेवलांछनैर्दातुः प्रतीपैः फणिनामिवामृतम् |येऽस्मत्प्रसादोपचिता हि यादवा आज्ञापयंत्यद्य गतत्रपा बत ॥२७॥येथूनि याचा स्नेह पुरे । कायसे आमुचे हे सोयरे । वाढले नृपचिह्नांच्या भरें । तें यां न स्मरे कृतघ्नां ॥३॥नरदेव जे चक्रवर्ती । त्यांचीं चिह्नें नृपसंपत्ति । पुरे येथूनि यादवांप्रति । केंवि मिरविती आम्हांपुढें ॥४॥जेहीं यां दिधलीं साम्राज्यचिह्नें । प्रतीप झाले त्यांकारणें । सर्प पोसिला अमृतपानें । गरळदानें जेंवि फळें ॥२०५॥आमुच्या प्रसादेंचि उपचय । पावला यादवांचा निचय । तो विसरूनि पूर्वन्वय । निर्लज्ज काय वदती हे ॥६॥बत हा खेद वाटे मोठा । यादवीं धरिला केवढा ताठा । जे न लाहती पादपीठा । ते आजि मुकुटा चढूं आले ॥७॥करुनृपाची आज्ञा कानीं । ऐकतां येती जे धांवूनी । तिहीं आजी निर्लज्जपणीं । आज्ञा सांगोनि पाठविली ॥८॥ऐसे कृतघ्न हे यादव । पुरे यांचें नृपवैभव । आतां हिरोनि घेऊं सर्व । देऊं लाघव यां योग्य ॥९॥कथमिंद्रोऽपि कुरुभिर्भीष्मद्रोणार्जुनादिभिः । अदत्तमवरुंधीत सिंहग्रस्तमिवोरणः ॥२८॥इन्द्रही हो कां अमरनायक । न देतां भीष्मार्जुनादिक । वाहों न शके भूभुजाङ्क । जेंवि अविक सिंहग्रासा ॥२१०॥बस्त मातलाही सबळ । घेऊं न शके सिंहकवळ । तैसे यादव झाले प्रबळ । अनर्ह केवळ नृपचिह्नां ॥११॥कौरवांपुढें राजचिह्नां । इन्द्रही मिरवूं न शके जाणा । तेणें यदुवृष्णींची गणना । असो सामान्यांमाजिवडी ॥१२॥शुक म्हणे कौरवपाळा । इत्यादि हेलनोक्तीच्या माळा । परस्परें बोलतां खळां । रोहिणीबाळा ऐकविलें ॥१३॥श्रीशुक उवाच । जन्मबंधुश्रियोन्नद्धमदास्ते भरतर्षभ । आश्राव्य रामं दुर्वाच्यमसभ्या पुरमाविशन् ॥२९॥कौरव अष्टमदें उन्मत्त । जन्म म्हणीजे मद आभिजात्य । बन्धुवर्गाचा सन्निपात । बळें औद्धत्य मिरविती ॥१४॥विशेष राज्यश्रियेचा मद । वीरश्री आंगीं वाहती विशद । शीळदुर्विनीतता प्रसिद्ध । श्रियोन्नद्ध असभ्य जे ॥२१५॥यदुनिंदेचीं परुष वाक्यें । रामा परिसवोनियां स्वमुखें । असभ्य म्हणिजे दुर्जन असिके । उठिले तवकें तेथूनी ॥१६॥न पाहोनि रामाकडे । हेलनोक्ति वदती तोंडें । स्वपुरीं प्रवेशले रोकडे । आले निवाडे स्वस्थाना ॥१७॥आधीं देऊनियां सम्मान । अर्घ्यपाद्यादि समर्पून । शेखीं गेले उपेक्षून । परुष वचनें बोलोनियां ॥१८॥कौरवांचें देखोनि शीळ । कार्य करिता झाला बळ । तें तूं कुरुवर्या प्राञ्जळ । ऐकें समूळ निरूपितों ॥१९॥दृष्ट्वा कुरूणां दौःशील्यं श्रुत्वाऽवाज्यानि चाच्युतः । अवोचत्कोपसंरब्धो दुष्प्रेक्ष्यः प्रहसन्मुहः ॥३०॥दुष्ट शीळ हें कौरवांचें । रामें सविस्तर देखूनि साचें । बोलिले वचनें जें दुर्वाचे । करी तयांचें अनुस्मरण ॥२२०॥क्रोधें उचंबळला फार । दुःखें न पाहवें ज्या समोर । प्रस्तावला वारंवार । विस्मयपर हास्य करी ॥२१॥उद्धव आणि श्रेष्ठ ब्राह्मण । तयांसी बोले प्रस्तावून । राया होऊनि सावधान । तें तूं श्रवण करीं आतां ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP