मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर यस्य पादयुगं साक्षाच्छ्रीरुपास्तेऽखिलेश्वरी । स नार्हति किल श्रीशो नरदेवपरिच्छदान् ॥३६॥विश्वश्री जे अखिलेश्वरी । जियेच्या सुरस्त्रिया किङ्करी । ते जे साक्षात् परमेश्वरी । पदयुग स्वकरीं मर्दितसे ॥५३॥तो श्रीनायक निश्चयेसीं । योग्य नव्हे नृपचिह्नांसी । ऐसें बोलतां कौरवांसी । लज्जा मानसीं कां न वटे ॥५४॥खद्योत नोकिती दिनेशा । वायस न मानिती राजहंसा । तेंवि कौरव परमपुरुषा । गणिती मानुषांमाजिवडे ॥२५५॥ज्या कृष्णाचा अगाध महिमा । वर्णूं न शके शङ्कर ब्रह्मा । प्रत्यक्ष दिसतो आम्हां तुम्हां । प्रकट गरिमा ते ऐका ॥५६॥यस्यांघ्रिपंकजरजोऽखिललोकपालैर्मौल्युत्तमैर्धृतमुपासिततीर्थतीर्थम् ।ब्रह्मा भवोऽहमपि यस्य कलाः कलायाः श्रीश्चोद्वहेम चिरमस्य नृपासनं वव ॥३७॥ज्या कृष्णाचे चरणाब्जरज । अख्ल लोकपाळांचे पुञ्ज । उत्तम मौळी करूनि सहज । चर्चिती सुतेज ऐश्वर्या ॥५७॥हरिपदपंकजरजोलेपनें । मौळी मिरविती उत्तमपणें । ऐसिये निगमगर्भींचे खुणे । जाणूनि भूषणें मिरवती ॥५८॥सार्ध त्रिकोटी जिहीं तीर्थें । उपासिलीं सप्रेम आर्तें । तयां योगीश्वरांपरौतें । वरिष्ठ तीर्थ आन नसे ॥५९॥तयां योगियांही तीर्थ परम । हरिपदाब्जरज उत्तम । अथवा जाह्ववी कैवल्यधाम । ओपी निस्सीम उपासितां ॥२६०॥तयेचें जें जन्मस्थान । यालागीं तीर्थांचें पूण । श्रीकृष्णाचे पादाब्जरेणु । त्रिजगत्पावनपटुतर जे ॥६१॥लक्ष्मी विरंचि गौरीरमण । आणि मी जो संकर्षण । कृष्णपादाब्जरजःकण । वाहों भूषण निजमौळीं ॥६२॥कृष्णांशाचे अंशभूत । श्रीविधिहरादि आम्ही समस्त । त्यातें नृपासन नाशवंत । अल्प प्राकृत कोणीकडे ॥६३॥ऐसिया त्रिजगन्ननका हरी । कौरवीं हेळिलें व्यंग्योत्तरीं । हाचि विस्मय मज अंतरीं । वदतां वैखरी लाजतसे ॥६४॥कृष्णनिंदा ऐकतां कानीं । निंदकांची प्राणहानि । म्यां करावी तेचि क्षणीं । तो मी आझूनि उगा असें ॥२६५॥आणिक बोलिले पैशून्यवचन । त्याचें करूनि अनुस्मरण । वदे विस्मयें संकर्षण । तें सज्जन परिसतू ॥६६॥भुंजते कुरुभिर्दत्तं भूखंडं वृष्णयः किल । उपानहः किल वयं स्वयं तु कुरवः शिरः ॥३८॥कौरवीं दिधली परिमिता क्षिती । तेथील ऐश्वर्य वृष्णि भोगिती । आजि ते कुरुवरा आज्ञा करिती । हे काळगति विपरीत ॥६७॥आम्ही उपानह केवळ । स्वयें कौरव अमळ मौळ । ऐशा दुरुक्ति वदले बहळ । लज्जा अळुमाळ न धरूनियां ॥६८॥किल म्हणिजे निश्चयात्मक । आम्ही उपानहचि सम्यक । कौरव उत्तमाङ्ग मस्तक । ऐसा विवेक दृढ केला ॥६९॥हेलनोक्तीच्या अनुस्मरणें । रसरसूनि संकर्षणें । आवांकिलें जें अंतःकरणें । तें श्रोतीं श्रवणें परिसावें ॥२७०॥अहो ऐश्वर्यमत्तानां मत्तानामिव मानिनाम् । असंबद्धा गिरोरूक्षाः कः सहेतानुशासिता ॥३९॥सखेद परमाश्चर्यें म्हणे । ऐश्वर्यमत्तांचें बोलणें । मद्यपा उन्मत्ताप्रमाणें । कोणा साहणें घडेल ॥७१॥गौडी माध्वी पैष्टी वारुणी । क्षौद्री मैरेयी गोस्तनी । उन्मत्त इत्यादि मदिरापानी । परुशभाषणी भ्रमग्रस्त ॥७२॥कौरव तैसे ऐश्वर्यमस्त । परुषवाक्यें अपरिमित । वदतां सोढव्य करील येथ । कोण सामर्थ्य असतांही ॥७३॥स्वयें होत्साता दण्डधर । आणि कुटिलोक्ति या कठोर । कोण साहील धरूनि धीर । आजि हे पामर निर्दाळीन ॥७४॥करितां कृतघ्नां उपकार । फिरूनि करिती ते अपकार । त्यांचा करूनियां संहार । गर्वपरिहार करूं आजी ॥२७५॥पंजरी न शोभे काउळा । पुष्पभूषणें गोळाङ्गुळा । तेंवि कौरवां कुटिलां खळां । स्नेहजिव्हाळा अयोग्य ॥७६॥पंचाङ्गुळीं मंडित पाणि । भोजनीं प्रविष्ट अन्नीं वदनीं । तेथ उधवतां नखाग्रश्रेणी । सवेग छेदूनि काढाव्या ॥७७॥तेंवि आप्तांमाजीं दृप्त । कौरव करीन आजि समाप्त । मज कोपतां यातें गुप्त । न करी व्युप्तकेशविधिही ॥७८॥अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामीत्यमर्षितः । गृहीत्वा हलमुत्तस्थौ दहन्निव जगत्त्रम् ॥४०॥आजि निष्कौरवी धरा । करीन ऐसिया निर्धारा । बोलोनि उचलिलें नांगरा । दांत करकरां खाऊनी ॥७९॥क्रोधें थरथरां कांपे गात्र । खदिराङ्गारासारिखे नेत्र । प्रळयकाळीं कुबेरमित्र । त्रिजगत्संहारक जैसा ॥२८०॥तैसा क्षोभे उठिला बळ । प्रबळबळें परजिला हळ । दिसे जैसा कृतान्त काळ । प्रळयानळ कीं दूसरा ॥८१॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP