मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४९ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ४९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ अध्याय ४९ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - स गत्वा हास्तिनपुरं पौरवेंद्रयशोंऽकितम् ।ददर्श तत्रांबिकेयं सभीष्मं विदुरं पृथाम् ॥१॥सहपुत्रं च बाह्लीकं भारद्वाजं सगौतमम् ।कर्णं दुर्योधनं द्रौणिं पाण्डवान्सुहृदोऽपरान् ॥२॥शुक म्हणे गा श्रोतृरत्ना । कुरुकुळमलयाचलचंदना । यशःसौरभ्यें निवविसी जना । सुरसज्जनां गुणतिलकीं ॥५३॥कृष्णानुज्ञा वंदूनि शिरीं । अक्रूर सानुराग सहरहंवरीं । हस्तिनापुरा प्रयाण करी । हृदयीं श्रीहरि चिंतूनी ॥५४॥हरिस्मरणें दोषनिवृत्ति । तैशा वसती क्रमूनि पंथीं । तीर्थभ्रम कीं द्वारावती । तेंचि कुंती पहावया ॥५५॥पुढें जाऊनि हस्तिनापुरा । आत्मागमन चारद्वारा । विदित केलें अंबिकाकुमरा । प्रेरी सामोरा प्रधान तो ॥५६॥ययातीचा तनयोत्तम । पूरु ऐसें जयासि नाम । तदन्वयीं ज्याचें जन्म । प्रतापधाम पौरव ते ॥५७॥महाभिश दुष्यन्त भरत । शंतनु भीष्म विचित्ररथ । पांडुधृतराष्ट्रपर्यंत । यशोमंडित पुरशोभा ॥५८॥पौरवीं निर्मिलीं देवागारें । ब्राह्मणायतनें अग्रहारे । हयमेधप्रमुख यज्ञागारें । विश्रांतिकरें सर्वत्र ॥५९॥अन्नाच्छादनकृतनैश्चित्य । ब्राह्मण स्ववर्णाश्रमनिरत । व्रतीं गृहस्थ वानप्रस्थ । स्वधर्ममंडित पुरगर्भीं ॥६०॥वेदाध्यायी ब्रह्मचारी । श्रौतस्मार्तें घरोघरीं । पुराणश्रवणें गंगातीरीं । प्रजा व्यापारीं भयरहिता ॥६१॥वनें उपवनें वाटिका । तपोधनांच्या गुहा मठिका । स्वधर्मनिर्नयधर्मपीठिका । हाट वटिका चौबारें ॥६२॥रत्नखचितकलशश्रेणी । ध्वजा पताका झळकती गगनीं । मखरीं तोरणीं वितानीं । वैडूर्यमणि लखलखिती ॥६३॥पौरवेंद्र यशोंऽकित । अक्रूर नगर पाहत पाहत । पातला राजभुवना आंत । अंबिकासुत जे ठायीं ॥६४॥यान विसर्जूनि लवलाहीं । प्रवेशोनि सभालयीं । मौळ ठेवूनियां पायीं । भीष्मद्रोण वंदिले ॥६५॥तिहीं देतां आलिंगन । नमिले गौतमद्रोणनंदन । बाहूलीक भूरिश्रवा कर्ण । क्रमेंकरून भेटले ॥६६॥प्रज्ञाचक्षु तो धृतराष्ट्र । त्रिकालज्ञ क्षत्ता विदुर । पृथेसहित पांडुकुमर । आणि गांधार अवघेचि ॥६७॥शकुनिप्रमुख सुहृद आप्त । गांधारदुर्योधनांसहित । देखतां झाला गांदिनीसुत । त्यातें यशोचित आळंगी ॥६८॥यथावदुपसंगम्य बंधुभिर्गांदिनीसुतः । संस्पृष्टस्तैः सुहृद्वार्तां स्वयं चापृच्छदव्ययम् ॥३॥निजानुयायी यूथपति । तिहींसीं अक्रूर कौरवांप्रति । भेटला आणि साधुवृत्ति । तिहीं समस्तीं मानिला ॥६९॥समस्तीं पुसिलें सुस्वागत । कुशल यादवकुल समस्त । त्यांतें कथूनि यथावृत्त । स्वयेंही पुसत त्या कुशळ ॥७०॥कृष्णें कथिल्या वृत्तांतास । विवराया निजमानस । तेथें राहिला कित्तेक मास । तें रायास मुनि सांगे ॥७१॥उवास कंतिचिन्मासान्राज्ञो वृत्तविवित्सया । दुष्प्रजस्याल्पसारस्य खलच्छंदानुवर्तिनः ॥४॥राजा धृतराष्ट्र अंबिकासुत । दुष्टपुत्रेंसिं पुत्रवंत । दुर्मति आणि धैर्यरहित । छंदें वर्तत खळांचिया ॥७२॥दुर्योधन दुःशासन । परमान्यायी निजसंतान । मोहे म्हणवी पुत्रवान । न करी शासन कृतागसां ॥७३॥पुत्रमोहें व्याकुळित । विशेष खळच्छंदें वर्तत । कर्ण शकुनि जयद्रथ । स्वयें संमत या दुष्टां ॥७४॥स्वयें आपण रहितनेत्र । दुष्टव्चतुष्टयकथितमंत्र । ऐकोनि वर्ते तदनुसूत्र । खंडूनि पवित्र धर्मपथा ॥७५॥त्याचें पाहावया चेष्टित । सरळ कुटिळ मनोरथ । अक्रूर राहिला मास बहुत । कीं उमजे वृत्त सहवासें ॥७६॥दुष्ट मंत्र म्हणसी कैसा । तो तूं ऐकें कुरुनरेशा । सद्गुणीं आरोप करूनि दोषा । कपटें नाशा प्रवर्तती ॥७७॥तेज ओजो बलं वीर्यं प्रश्रयादींश्च सद्गुणान् । प्रजानुरागं पार्थेषु न सहद्भिश्चिकीर्षितम् ॥५॥पृथाशब्दें बोलिजे कुंती । तिच्या पुत्रां पार्थ म्हणती । कुंतीसुतांची संपत्ति । ऐकें नृपति गुणवंता ॥७८॥तेज ओज वीर्य बळ । प्रश्रयादि सद्गुण बहळ । पांडवीं देखोनि प्रजा सकळ । भजती स्नेहाळ मानूनी ॥७९॥तेज म्हणिजे प्रभावशक्ति । स्वयंभ आंगींची ऐश्वर्यवृत्ति । ओज म्हणिजे शस्त्रास्त्रमति । अभ्यासयुक्ति पटुतरता ॥८०॥वीर्यशब्दें बोलिजे शौर्य । शत्रुसमरीं न भंगे धैर्य । न पाहता आश्रयसाह्य । बुद्धि निर्भय नैसर्ग्य ॥८१॥स्वयंभ शरीरशक्ति तें बळ । तनुठकार अभ्यासशीळ । बाहु सदट मंदराचळ । कवळूं पाहती उन्मळना ॥८२॥प्रश्रय म्हणिजे विनयभाव । नीतिनैपुण्य स्नेहलाघव । सेना सेवक प्रजा सर्व । निजगौरवें वर्त्तवणें ॥८३॥दया दाक्षिण्य वदान्यता । प्रताप प्रागल्भ्य दुधर्षता । दीनानुकंपा मितवक्तृता । मिष्ट अमृतासम वदती ॥८४॥ऐसे सद्गुणमंडित पार्थ । देखोनि कौरव दुष्पथनिरत । न साहोनि पांडवचरित । म्हणती अनर्थ हे आम्हां ॥८५॥स्वगुणीं प्रजा करूनि वश्य । आम्हां नेमिती आपुलें दास्य । कैंचें राज्य कैचें यश । करूनि पोष्य वर्तविती ॥८६॥आपुलिया कल्याणाकार्रणें । तिहीं दुष्टीं जो विचार करणें । चिकीर्षित ऐसें त्यातें म्हणणें । तें ऐकणें श्लोकार्थें ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP