मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५ वा| श्लोक ३१ ते ३३ अध्याय ५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ अध्याय ५ वा - श्लोक ३१ ते ३३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३३ Translation - भाषांतर तस्मान्मृत्युवियुक्तानां काले दर्शनयोगयोः । संभवादिति ता वाचो दैवीः श्रुत्वाऽजहाच्छुचम् ॥३१॥म्हणोनि या कारणास्तव । मृत्यूनें वियोग पावले जीव । त्यांच्या दर्शनाचा संभव । काळें दैवप्रसंगें ॥५९॥ऐशी नंदमुखें दैवीवाणी । ऐकोनि वसुदेव अंतःकरणीं । निवाला विवेकें विवरूनि । शोक सांडोनि राहिला ॥२६०॥आजि नंदाचा दैवयोग । पुत्रलाभाचा आनंदभोग । पुढें होईल वियोग । मज संयोगसुखलाभ ॥६१॥ऐसा गूढार्थ विवरूनि । वसुदेवें शोक सांडोनि । मग नंदाप्रति संकेतवाणी । काय ते क्षणीं बोलिला ॥६२॥वसुदेव उवाच - करो वै वार्षिको दत्तो राज्ञे दृष्टा वयं च वः । नेह स्थेयं बहुतिथं सन्त्युत्पाताश्च गोकुळे ॥३२॥वसुदेव म्हणे गा व्रजपति । कर दिधला रायाप्रति । एथ बहुकाळ न करीं वसति । गोकुळीं होती उत्पात ॥६३॥तुमची आमची झाली भेटी । एकमेकां पाहिलें दृष्टीं । स्नेहवादें गुह्यगोष्टी । सुखसंतुष्टी बोलिलों ॥६४॥आतां इथें न रहावें । बृहद्वना सत्वर जावें । तेथ विघ्नांचे उठती यावे । सावध असावें सर्वदा ॥२६५॥श्रीशुक उवाच - इति नन्दादयो गोपाः प्रोक्तास्ते शौरिणा ययुः । अनोभिरनडुद्युक्तैस्तमनुज्ञाप्य गोकुलम् ॥३३॥ऐसा वसुदेवाचा गुह्य संवाद । ऐकोनि नंदादिगोपवृंद । गाडे भरूनिया सन्नद्ध । झाले सिद्ध जावया ॥६६॥ बैल जुंपूनि गाड्यांसी । निषंग बाम्धोनि पाठीसी । जाते झाले गोकुळासी । वसुदेवासी पुसोनि ॥६७॥वसुदेवही घेऊनि आज्ञा । जाता झाला आत्मसदना । इतुकी कथा कुरुभूषणा । पंचमाध्यायीं शुक सांगे ॥६८॥इति श्रीमद्भागवत । महापुराण विख्यात । अठरासहस्र विस्तृत । पारमहंसी संहिता ॥६९॥आदिनाथक्रमें लब्ध । दत्तात्रेयकृपावरद । जनार्दनकुरणार्हद । एकनाथ भरियेला ॥२७०॥तेथील पूर्णदयेचा ओघ । चिदानंदप्रवाह साङ्ग । स्वानंदजीवनें गोविंदगांग । दयार्णवीं सांठवलें ॥७१॥तेथींचीं अमूल्यशब्दरत्नें । श्रवणीं घेऊनि हृदयीं यत्नें । सांठविजे अप्रयत्नें । सुलभ सामान्य न मानावीं ॥७२॥सर्वांप्रति हेचि विनति । सावध असावें आत्महितीं । हृदयीं धरूनि भगवन्मूर्ति । निजविश्रांति साधावी ॥२७३॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहरुयां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां नंदव्रजे जातकर्मवर्णनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥प्लवंगाब्दे दीपोत्सवे भूतेंदौ समाप्तिमगमत् । श्रीरामकृष्णवासुदेव । श्रीकृष्णार्पणमस्तु । ओवीसंख्या ॥२७३॥ श्लोकसंख्या ॥३३॥ एवम् ॥३०६॥ ( पांच अध्याय मिळून ओवीसंख्या ३५३३ ) हरिवरदा टीका पांचवा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP