मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मुकुंदराज महाराज बांदकर| श्रीमल्लिकेशाचें पद श्री मुकुंदराज महाराज बांदकर श्रीगणपतीचीं पदें श्रीरामाचीं पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद श्रीग्रामदेवी श्रीषष्टी शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांततीर्थस्वामी यांचीं पदें श्रीकमलानाथतीर्थ स्वामीचें पद श्रीकृष्ण महाराज बांदकर यांचें पद श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला पवित्र उपदेश श्रीमल्लिकेशाचें पद श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः । Tags : abhangbandkarmukund rajpadअभंगपदबांदकरमुकुंदराज श्रीमल्लिकेशाचें पद Translation - भाषांतर यारे पाहुं चला मल्लिकेश सदयाला । भक्तांसाठीं जो आला प्रभु उदयाला । तारिल निश्चय हा सत्यचि गमत मनाला । आत्म जनाला ॥धृ०॥प्रेमें जे भरती मजला त्यां पदिं थारा । देउनि उद्धरिं मी वारुनियां जडभारा । जे नर कपटी त्यां घेउनियां अवतारा ॥चाल॥ करितों शिक्षा मी समजवि हें सकळांला । प्रत्यय आला ॥या०॥१॥ज्यां निजभजनाची आवडि मानसिं मोठी । दासां त्यां नुरवी भव दुःखाच्या कोटी । सायुध संरक्षी राहुनि पाठि पोटीं ॥चाल॥ यास्तव चालविलें कीर्तन सप्ताहाला । घ्या लाभाला ॥या०॥२॥चक्षू गुण गज भू शक साधारण नामे । वर्षी आषाढीं कृष्णाष्टभिला प्रेमें । केलें आरंभा या देवालयिं नेमें ॥चाल॥ श्रीमद्गुरुवारीं करुनि नाम गजराला । स्मरुनि चरणाला ॥या०॥३॥सातचि वर्षे ही सेवा कीं न करावी । नित्यचि भजनाची आवड पोटीं धरावी । गिरिजानाथाची चिन्मय मूर्ति वरावी ॥चाल॥पावन नाम खरें नुरवि कामलेशाला । सुख धामाला ॥या०॥४॥जय जय राम हरे कृष्ण हरे गोविंदा । संगें सुजनाच्या नित्यचि हा करुं धंदा । मिळुनि सर्व आह्मीं सेवुं परमानंदा ॥चाल॥ सनकादिक तरले धरुनि या मार्गाला । जिव हा धाला ॥या०॥५॥नामस्मरणाचा महिमा फारचि मोठा । स्मरत्यां संसारीं परमार्थीं नच तोटा । बोला विश्वासें जाळिल दुष्कृत कोठा ॥चाल॥ आला येत असे अनुभव कृष्ण सुताला । कथित सुजनाला ॥या०॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP