मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मुकुंदराज महाराज बांदकर| श्रीनरहरिरायाचें पद श्री मुकुंदराज महाराज बांदकर श्रीगणपतीचीं पदें श्रीरामाचीं पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद श्रीग्रामदेवी श्रीषष्टी शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांततीर्थस्वामी यांचीं पदें श्रीकमलानाथतीर्थ स्वामीचें पद श्रीकृष्ण महाराज बांदकर यांचें पद श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला पवित्र उपदेश श्रीनरहरिरायाचें पद श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः । Tags : abhangbandkarmukund rajpadअभंगपदबांदकरमुकुंदराज श्रीनरहरिरायाचें पद Translation - भाषांतर अर्पिली चरणिं हे काया । मज तारीं नरहरिराया ॥धृ०॥कुलदेव आमुचा कळला । प्रेमभाव हृदयीं बळला । बहु जन्म घेउनी मळला जीव हा तवपदीं वळला ॥चाल॥ तूं तारक एकचि साचा । हा निश्चय जाण मनाचा । मज लाविं छंद भजनाचा । बहु आवडि तव गुण गाया ॥अ० मजतारीं०॥१॥प्रर्हाद भक्त तुज स्मरला । म्हणुनि तुं स्तंभिं गुरगुरला । त्रिजगांत भरुनि जो उरला । होउनि सगुण अवतरला ॥चाल॥ तुज काय कठिणजी देवा । मजकडुनि घेइं निज सेवा । दे प्रेम भक्ति रस मेवा । पथ अन्य न गमत तराया ॥अ० मजतारीं०॥२॥अन्न वस्त्र देउनि साचें । कल्याण करीं सर्वांचें । मागणें हेंचि प्रेमाचें । कथिलें तुज कृष्ण सुताचें ॥चाल॥ नयनीं निजरूप पहावें । स्वरुपीं स्थिर चित्त रहावें । भवसागर तरुनी जावें । कर जोडुनि वंदन पाया ॥अर्पिली० मज तारीं०॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP