मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामी कृत अभंग| अभंग २१ ते २५ निरंजन स्वामी कृत अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग दत्तजन्माचे अभंग ५० ते ५४ निरंजन स्वामी कृत - अभंग २१ ते २५ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : abhangmarathiniranjam raghunathअभंगनिरंजन रघुनाथमराठी अभंग २१ ते २५ Translation - भाषांतर अभंग २१.नाहीं आह्मां पापपुण्यासी कारण । नाहीं येणें जाणें स्वर्गलोकीं ॥१॥पातकाचा वाटा निंदकासी दीला । स्तुति करिति त्याला पुण्य दीलें ॥२॥दोन्हीभागीं आह्मी अलिप्त सर्वदा । स्तुती करो निंदा कोणी तरी ॥३॥निरंजन ह्मणे निरंजन आह्मी । कर्मया कर्मीं अलिप्तची ॥४॥अभंग २२.दत्तत्रया स्वामि सर्वाचा हो दाता । नाहीं ठाव रीता तयावीण ॥१॥भागीरथीमाजी सारूनिया स्नान । करि भिक्षाटन कोल्हापूरी ॥२॥पंचाळेश्वरासी भोजनासि जावें । आसन करावें शेषाचळीं ॥३॥माहूरपर्वतीं करुनिया निद्रा । गिरिनारीं मुद्रा सारीतसे ॥४॥निरंजनिं वनिं अक्षई रहातो । धावूनीया येतो आठवितां ॥५॥अभंग ( ग्रंथाचे ) २३येई वो श्रीगूरू स्वामि दत्तात्रया । दयाळा सखया दीनबंधू ॥१॥अनाथाचा नाथ कृपेचा सागर । बहो तूं उदार सर्वागूणें ॥२॥भक्तकाजासाठीं धाऊनियां येसी । हेचि वागवीसी ब्रीद सदा ॥३॥निरंजन ह्मणे धाउनिया यावें । ग्रंथ ऊठवावे जळाले ते ॥४॥अभंग २४. गिरनारा ठाई भेटुनीया तुवां । शब्द देवदेवा बोलीलासी ॥१॥नि:संग कविता गाई माझे गूण । निर्गूण सगूण कैसे तरी ॥२॥करिसि जे कविता चालेल पृथ्वीवरी । होईल सर्वापरी मान्य सदा ॥३॥निरंजन ह्मणे तरि त्वां सत्वरि यावें । ग्रंथ ऊठवावे जळाले ते ॥४॥अभंग २५.त्झे आज्ञेवरुनी वदलों कविता । पद आणि ग्रंथा करूनीयां ॥१॥तेथें जालें विघ्न जळाली कविता । रक्षा आली हातां मुष्टीभरी ॥२॥तेचि रक्षा आतां बांधोनीं पदरीं । सप्तशृंगावरी आलों स्वामी ॥३॥निरंजन ह्मणे धाऊनीया यावें । ग्रंथ ऊठवावे जलाले तें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP