उत्कृति

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


सुधा.
गण - ज, स, न, भ, ज, स, न, भ, ल, ग.
यति - ८, ८, १०
ज सा न भ ज सा न भ लगांतक पदांतक वसुद्वयदशें करिं सुधा.
यथाविध जसा रसभरा मधु, तसा रचिं यथारुचि सुतोषण बुधा,
सुरासुरनरोरगमहाजनमनोहर, तपाश्रितमनोरथगणा -
चकोरककदंबक कलानिधिकलासम तुला धरि फलार्पणगुणा. ॥२९॥
दंडक.
न गणयुगुल यावरी सप्त रेफीं घडे चंडवृष्टिप्रपाताख्य हा दंडक. ॥१३०॥
प्रतिचरणवृद्ध रेफीं तदा अर्णअर्णार्णवव्याळजीमूतशंखादि
या नाम कीं दंडक. ॥३१॥
भुजगपति स्वमुखाब्जें वदे यापरी न द्वयानंतरें य त्तकारें
घडे दंडकाळीं विचित्रा. ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP