TransLiteral Foundation

धृति

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


धृति
कुसुमितलता.
गण - म, त, न, य, य, य.
यति - ५, ६, ७.
वृता योजीं, गा, म्म त न य य या अक्षरीं युक्तिमंता;
वृत्तांमध्यें हे कुसुमितलता मुख्य कांता वसंता.
चित्तातें देते प्रसुख निववी अंतरा चारुगंधा.
भूतीं, षट्काश्वीं यति भज, सखे; ना मिळे बुद्धिमंदा. ॥१४॥
कोकिला.
गण - न, न, र, र, र, र.
यति - १०, ८.
न न रजलधि अक्षरांनीं बरी योजिजे कोकिला.
निववि मधुरगगगानें यया सर्व भूमंडळा.
सुकुसुमितरसालभूषा असे श्री जशी कानना
विरति सधवसूसमेता प्रिया मानली सज्जनां. ॥१५॥
मल्लिका.
विबुधप्रिया
गण - र, स, ज, ज, भ, र.
रा स जा ज भ रा गणीं जरि गुंफिशी नव मल्लिका,
कंठगा विलसे, तदा कविमंडळीं दिससी निका.
हे वसंतविभूषणा सकळां जनांप्रति आवडे
सौरभें मन पूर्ण हे करि कोण वर्ण्य इचां पुढें ? ॥१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:53.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निष्कळंकी

  • वि. डाग , ठपका , काळिमा , कलंक नसलेला ; निर्मळ ; शुद्ध ; पवित्र ; निर्दोष . सत्वाथिला अतिसात्विक । निष्कलंक शोभत । - एरुस्व १ . १२ . [ सं . ] निष्कळंकी अवतार --- पु . ( चुकीने ) दहावा कलंकी अवतार . 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.