अनुष्टुप्

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


चित्रपदा.
गण - भ, भ, ग, ग.
भ द्वय दोनि गुरूंची । चित्रपदा सुगुणांची.
पंडितमानसहारी, । वर्णजनांत विहारी. ॥४०॥
विद्यान्माला.
गण - म, म, ग, ग.
मा मा गा गा विद्युन्माला । दों मार्गांनीं योजी बाला.
वाणी शोभे ईचां संगें । संतांचां हे चित्ता रंगे. ॥४१॥
माणवक.
गण - भ, त, ल, ग.
भा त ल गा माणवका । योजिशि तूं सद्गुणका,
पावशि सौख्यामृत तें । या भुवनांतीं, सुमते. ॥४२॥
प्रमाणिका अथवा नगस्वरूपिणी.
गण - ज, र, ल, ग.
ज रीं ल गीं प्रमाणिका । सुयोजिशी प्रमाणिका.
इलाचि बोलती जनीं । कवी नगस्वरूपिणी. ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP