उष्णिग्

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


मदलेखा.
गण - म, स, ग.
मा सांतीं गुरु लेखा; । शोभे हे मदलेखा.
मातंगी, मधुरेखा, । तैशी हेचि सुरेखा. ॥३४॥
मधुमती.
गण - न, भ, ग.
मधुमती न भ गा । कविजनीं उमगा.
तरि रसें भरिता । प्रसुख दे कविता. ॥३५॥
कुमारलतिका.
गण - ज, स, ग.
ज सा ग युत ते, गा, । कुमारलतिका गा;
करीं धरुनि वीणा । प्रदोष करि, जाणा. ॥३६॥
हंसमाला.
गण - स, र, ग.
स र गा हंसमाला । विरची पुण्यशीला,
कविता राजबाळा । मिरवे चारुलीला. ॥३७॥
हेमाक्षी.
गण - म, म, ग.
मा दोनी गा पादांतीं । हेमाक्षी हे वृत्तांतीं.
गुर्वी सातां वर्णांची, । इच्छा पुर्वी कर्णांची. ॥३८॥
सुमना.
गण - न, न, ग.
न न गुरु सुमना । रमविल सुमना.
रसलघुगयुता । रसिकजनमता. ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP