प्रसंग पंधरावा - अभक्त

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आंबे सालें तुरट रस गोड । आठोळी  निबर जैसा दगड । तैसा अभक्तांचा कैवाड । देखा गोमटें ॥७४॥
इंद्रावनें कोंवळी कडवट । पक्व जाल्‍या येतसे वीट । तैसे अभक्त अति नष्‍ट । तारुण्य वृद्धपणीं ॥७५॥
पक्व जालिया वृंदावन । अमृतफळासारिखे दिसे दुरून । हातीं धरूं नये कडूपण । तदन्यायें कपट्याचें ॥७६॥
जो स्‍वयें अति नष्‍ट चांडाळ । त्‍याला साधु दिसती अमंगळ । संचितानें पापें तुंबळ । तेणें गुणें ॥७७॥
हिरा गवसल्‍या उपरी । जरी टाकिजे विष्‍टे माझारीं । तरी आपुलाच घात होय विचारी । हिरा संपुट चढे ॥७८॥
तैसेंच साधूचें निंदन । लाधेन करितसे जन । तों तों साधूचें चोखाळपण । निंदक नरिये भोगिती ॥७९॥
ऐका मनुष्‍यहत्‍येचें पातक । न फिटे तुळापुरी केल्‍या अभिषक । द्रव्य वांटिल्‍या कोडी लाख । धुवट नोहेंच पैं ॥८०॥
नरजन्मासारिखा हिरा । वेळोवेळां न ये संसारा । तो लाविती विषय अनाचारा । पूर्व संचिताविण ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP