मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा| स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा प्रसंग पंधरावा प्रसंग सोळावा चांद बोधले वासना-मुरळी वासनेसंगें अविचारी देवतांभजन वीर अन्नार्थी देवकरांनीं केलेलें पाखांड वासना भूते मारा अहंकार दमन गुरुनिंदा स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें अभक्त मनुष्यजन्मीं सद्गुरुसंगेंच मुक्ति सद्गुरुसेवाभाव व सद्गुरूची थोरीव प्रसंग समाप्ति प्रसंग पंधरावा - स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा Translation - भाषांतर भ्रतार असतां शिरावरी । जे स्त्री परद्वार करी । ते पाप फिटावया भूमीवरी । तीर्थें नाहींत परियेसा ॥५५॥स्त्री पापाचें आचरण । तें भ्रताराचें शिरीं संपूर्ण । पुण्य आचरे तो वांटा नाहीं जाण । भ्रतारालागीं ॥५६॥जे जे भ्रतार पापें करी । ते ते त्याच्याच शिरावरी । स्त्रीच्या पुण्याची सामुग्री । न लभेच वांटा ॥५७॥स्त्रीच्या पापें एक्या गुणें । तिशीं भोगितों एकाग्र मनें । म्हणूनि आपल्या तिच्या पापें बुडणें । लागे भ्रतारासी ॥५८॥नर नारीचा पुण्य आचार । एकविध पूजिती ईश्र्वर । तेणें उद्धरे सकळ नर । श्रियाळ चांगुणा साक्ष ॥५९॥वाचेनें आई बा-सें म्हणणें । उन्मत्तपणें तिशी रमणें । तीं पापें फिटावयाकारणें । उपाय नाहीं जाणा ॥६०॥दादा बाबा म्हणून वचनीं । त्यांसी भोग करिती चांडाळिणी । तीं पापें फेडावया मेदिनीं । ठाव नाहीं परियेसा ॥६१॥बाई दादा म्हणतां संकल्प पडला । तोचि मुदयी जाणिजे ठाकला । पापें घडलिया परमार्थ उमटला । तो दुसरा मुदयी वोळखा ॥६२॥यावेगळे चित्रगुप्त । लिहितील पापपुण्याची मात । अंगसंगें लागले जपत । ज्याचे वाचेनें त्याचें लिहिती ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP