मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा| वासना भूते मारा प्रसंग पंधरावा प्रसंग सोळावा चांद बोधले वासना-मुरळी वासनेसंगें अविचारी देवतांभजन वीर अन्नार्थी देवकरांनीं केलेलें पाखांड वासना भूते मारा अहंकार दमन गुरुनिंदा स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें अभक्त मनुष्यजन्मीं सद्गुरुसंगेंच मुक्ति सद्गुरुसेवाभाव व सद्गुरूची थोरीव प्रसंग समाप्ति प्रसंग पंधरावा - वासना भूते मारा श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वासना भूते मारा Translation - भाषांतर तों तों अज्ञानें धरिती भावो । म्हणती तूंच गा आमचा देवो । शीघ्र आपत्काळीं पावों । आम्हां दुर्बळालागीं ॥३१॥निमाल्यास जर घडे जन्मा येणें । तरी ब्रह्मीं काय असें उणें । कैसी बरळती अज्ञानें । मतिमंदें ॥३२॥आतां हे लिंगदेहाचे विकार । स्वप्नीं दावी अनेक अनाचार । जागृति जाल्या समाचार । मिथ्या भासे ॥३३॥तदन्यायें जिणें मरणें । सद्गुरुकृपें मरोनि उरणें । मग चुकेल पैं भ्रमणें । लक्ष चौर्यांशीची ॥३४॥जों नाहीं मोडिली भुतांची मान । तोंवरी योग विटंबना जाण । स्मरणाभजनाविण बरवेंपण । भूत निरासे ॥३५॥जें पुढें सांगिजेल भांडण । तें जोंवरी नाहीं केलें जाण । तों वाउगी दांभिक भूषण । चौर्यांशीच्या नांवें ॥३६॥मन आपल्यावर करूनी स्वार । दारोदार फिरवी गव्हार । ते न उतरती पार । अविद्येच्या संगें ॥३७॥जेव्हां राजा देईल मान्यता । तैसें अपमानीं असावें गुणवंता । तरीच लाभ घडेल आत्महिता । हें तुम्ही सत्य जाणा ॥३८॥जेव्हां घडती दुःखें अपमान । तेव्हां तर्कों न द्यावें अंतःकरण । तरीच मन भेटेल येऊन । संचितालागीं ॥३९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP