मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा| सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें प्रसंग पंधरावा प्रसंग सोळावा चांद बोधले वासना-मुरळी वासनेसंगें अविचारी देवतांभजन वीर अन्नार्थी देवकरांनीं केलेलें पाखांड वासना भूते मारा अहंकार दमन गुरुनिंदा स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें अभक्त मनुष्यजन्मीं सद्गुरुसंगेंच मुक्ति सद्गुरुसेवाभाव व सद्गुरूची थोरीव प्रसंग समाप्ति प्रसंग पंधरावा - सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें Translation - भाषांतर यालागीं हृदय शुच करा । परमार्थ शोधावा खरा । भाव भक्तीसी दृढ करा । सद्गुरु सेवूनियां ॥६४॥भीड धरूनी बोलती साधू । तर थोर घडे अपराधु । जैसें मातेचें स्तनीं अशुदधु । खांडकासंगें निघे ॥६५॥जैसा नीट कमानेचा तीर । तैसा सद्गुरु वचनाचा मार । तो सोशिल्या तरिजे भवसागर । शूरत्वपणें ॥६६॥विंधला तीर मागें मुरडे । तरी साधूस निंदा घडे । हें गुह्य न कळतां म्हणती वेडे । साधु थोर निंदक ॥६७॥पडोनि पर्जन्याच्या थेंबुटा । जरी चढोनि जाय वैकुंठा । तरी साधु हे म्हणती खोटा । बाध जडो पाहे ॥६८॥उंबराचें फुल तेंच फळ । तैसें साधूचे शब्द केवळ । मूर्खाचे शब्द निर्फळ । वायुफुलान्यायें ॥६९॥खारीक वरी गोडत्वपणें । भीतरीं कठीण आठोळी जाणें । तैशींच नष्टाचीं वचनें । वरपंगाची गोडी ॥७०॥केकतीला कांट्याचे वेढे । भीतरीं निपजती केवडे । तैसे साधूचे शब्द गाढे । परोपकारालागीं ॥७१॥फणस सर्वांगीं कांटावले । भीतरी महा गोडीनें कोंदले । तैसे साधुहृदय जालें । बोधासंगें परियेसा ॥७२॥नारळ कठीण दिसे बाहेर । भीतरीं खोबरे अरुवार । तैसें साधूचें अंतर । बोधें वोसंडले ॥७३॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP