प्रसंग बारावा - चांग-गोंधळ भरणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मूढ घडिक सूर्य नमस्‍कारी । घडिक भूंके मागतसे वारी । घडिक चांग बोला पुकारी । जोगेश्र्वरीं भैरवाचा ॥९५॥
घडिक म्‍हणे मंगळमूर्ति मोरया । घडिक जाये वनस्‍पती पुजावया । घडिक म्‍हणे वो महामाया । तूंचि माझी कुळस्‍वामीनी ॥९६॥
घडिक हजिवंत होत मल्‍लिकाचे । घडिक गोंधळे होऊनि नाचे । तेथें उच्चार करी अनेक भूतांचे । हातीं ताट घेऊनियां ॥९७॥
म्‍हणे यमाई नानाई गोंधळा यावें । आपला रंग भोग घेऊनि जावें । ऐसीं बाष्‍कळ बरळोनियां नांवें । बेइमानी होतसे ॥९८॥
गोंधळी नाचवित असे एक देवा । अनेकांस म्‍हणे रंग भोग न्यावा । ऐसी ही पहा अधर्माची ठेवा । जन उन्मत्त करित असे ॥९९॥
ऐसी नांवें बरळतां भागला अमंगळ । मग म्‍हणे करा सकळिक कोल्‍हाळ । परी न करित कांहीं सुफळ । स्‍वहित आपुलें ॥१००॥
जें जें जन करित असे भजन । त्‍या त्‍या भजनाचेच नेणें ज्ञान । एकाचिये नांवें एका करी निरोपण । साधु श्रीमुख सांडूनियां ॥१०१॥
जैसें कुटका टाकूनियां श्र्वानें । भांडविजेतील ते अज्ञानें । तैसे गोंधळ भोग सांडणें । जन देवतांस करी ॥१०२॥
आपुलें मुख सांडूनियां ग्रास । जरी आवडी घालीजे नेत्रांस । तरी महा दुःख होईल उदास । तदन्यायें देवताभजन ॥१०३॥
नासिक सांडोनि गंध पुष्‍प याति । आवडी जरी श्रवणीं घालीजेती । तरी सुगंधें कांही न होय तृप्ती । मन वासनेची ॥१०४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP