मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग बारावा| द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती प्रसंग बारावा प्रशस्ती-सद्गुरुसेवा षड्दर्शनें-पाखांडी भांडणें षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत द्वैतभावास अहंकार कारण द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती इतर सणांच्या व व्रतांच्या देवता पूजनोपासनीं चित्तचांचल्यता कोंबड्या बकर्यांचे देवास बळी नवससायास चांग-गोंधळ भरणें प्रसंग-समाप्ति प्रसंग बारावा - द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वारांच्या देवता-बाष्कळ समजुती Translation - भाषांतर रविवारजधी अदितवार तधीं म्हणती । आजि आम्हीं पुजूं म्हाळसापती । पेंभरीचा कुळस्वामी सती । जैजुरीचा थोर पडला संदेह । चंचळ भक्तालागी ॥२८॥सोमवारआतां सोमवारीं दिनीं म्हणती । आजी आम्ही पुजूं गिरिजापती । सोरटीचा सोमनाथ सती । आवंढ्या नागनाथ नोहें ॥२९॥एक म्हणती चला मानदेशशिखरा । एक म्हणती नवस केला भस्मासुरा । कैसें विटंबिलें शंकरा । या वारकरियानीं ॥३०॥ज्यासी असे वैष्णव संप्रदा । ते म्हणती वाचेसी शिव न यावा कदा । कैसे पातले पहा अनुवादा । कृत्रिम ज्ञानें भरलें ॥३१॥वैष्णव म्हणती आंघोळी करा । शिवभक्त म्हणती स्नान उच्चारा । न मिळती येरूनयेरांच्या विचारा । पत्रावळी टांचा म्हणती ॥३२॥शिवाचें हृदयीं विष्णु व्यापून । विष्णु ध्यातसे शिवालागुन । ऐसें असें दोहींचें सन्निधान । तें चंचळ भक्तांस न कळे ॥३३॥मंगळवारपुढें मंगळवाराचें दिनीं । पूजितील जगदंबा भवानी । एक म्हणती माहूरची कुळस्वामिनी । तुळजापुरीची न होय ॥३४॥पहा ऐसे एकचि देवतेलागी । नानापरी फाडिती अभागी । परी एकविध न होती सौभागी ईश्र्वरभजनालागी ॥३५॥बुधवारछप्पन कोडी चंडिका कात्यायनी । पूजिती बुधवाराचे दिनीं । ऐसे चंचळ करिती भ्रमणी । दासीपुत्राच्या न्यायें ॥३६॥दासीला अनेक रमतीं भ्रतार । कोणाच्यानें जालीन कळे गरोदर । व्याला पिताहि न होय ॥२७॥प्रत्यक्ष एक असतां खंडेराव । त्यासी वेगळा धरिती भाव । देखतां नेणें दासीपुत्र । तैसें निगुरियास जालें ॥३७॥गुरुवारबुधवार गतोनि आला बृहस्पतवार । मग स्मरे मुसलमान पीर । एकें ठायीं न धरिती निर्धार । कुडी रोजंदार ठेविली ॥३८॥घडिक दोम दोम ऐसें पुकारी । घडिक म्हणे येळकोट मल्हारी । घडिक उदो उदो म्हणे अविचारी । परब्रह्म सांडोनियां ॥३९॥लाजेनें पोरोजी लुगडीं उतरी । गळां लिंग करितसे कंदोरी । आचारभ्रष्ट अनाचारी । हात गहाण ठेविती ॥४०॥शुक्रवारशुक्रवारी चौण्डेश्र्वरी कात्यायनी । व्रत धारोनियां जाय लोटांगणीं । अनेक देवता ध्यातसे मनीं । शरीर कष्टवूनियां ॥४१॥एका देवाची उतरी आभरणें । एकासी चढवी अज्ञानपणें । जसें गयाळी चुचकारिलें सुनें । भलत्याच द्वारीं उभें असें ॥४२॥कोणी हेडावी कोणी चुचकारी । कोणी एकाचे उपान्नव चोरी । कोणी एकास पारधी चारीं । ते त्यास म्हणती बरें ॥४३॥श्र्वानान्यायें भ्रमती देवी देव्हारे । जीवित्व आयुष्याची मर्यादा सरे । ते चंचळ हेतुगुणें आवरे । शुभाशुभ करीतसे ॥४४॥शनिवारशनिवारीं घालून उजवा । करिती झोटिंगाची सेवा । पहा ऐशा या अविद्येच्या मावा । जगीं प्रवर्ततील ॥४५॥तरुवर याति निंब पिंपळ । वायसाचें विष्टेंत धरिलें स्थूळ । तेथें झोटिंग संचरे अमंगळ । त्याची मुंज करिती ॥४६॥पाषाण झोडी पाथरवट बैसोनि वर त्यास लाविती केज्या पैक्याचा शेंदूर । पूजा करिती लहान थोर । भगवंता नेणतां ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP