मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग बारावा| इतर सणांच्या व व्रतांच्या देवता प्रसंग बारावा प्रशस्ती-सद्गुरुसेवा षड्दर्शनें-पाखांडी भांडणें षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत द्वैतभावास अहंकार कारण द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती इतर सणांच्या व व्रतांच्या देवता पूजनोपासनीं चित्तचांचल्यता कोंबड्या बकर्यांचे देवास बळी नवससायास चांग-गोंधळ भरणें प्रसंग-समाप्ति प्रसंग बारावा - इतर सणांच्या व व्रतांच्या देवता श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत इतर सणांच्या व व्रतांच्या देवता Translation - भाषांतर आपलें कर्तव्य आपण पूजिती । साधूंचें याति नांव पुसती । आपुल्या प्रालब्धें आपण कष्टती । तो बोल ईश्र्वरासी नाहीं ॥४८॥शिमगा फाल्गुन होळीचे दिनीं । नग्न होऊनि पुजिती मायाराणी । ती डोळे दवडी अवलक्षणीं । जो पाहूं जाय त्याचें ॥४९॥एसें पहा एकिया भक्ता । फाडफाडूं खाती देवता । परी लाभ न घडे आत्महिता । निगुरिया पाखांडास ॥५०॥पहा वेश्या जालिया नारी । तिचा भलताच अभिलाष करी । तैशा ह्या देवता अविचारी । निगुर्यांस पीडिती ॥५१॥जो कोणी असे राजियाचा लाडका । त्याची मान्यता समस्त लोकां । तो कांहीं न करी चिंता धोका । तस्करा पुंडाचा ॥५२॥जो निर्धनीं असे काटकाभीतरीं । त्यास भलताच धरूं पाहे बेगारी । तैशा या देवता परोपरी मोकळ्याला जाचिती ॥५३॥जे कोणी श्रीहरीचे उपासक । सकळ देवतांस त्यांचा धाक। यम त्यापासी मागतसे भीक । उच्छिष्ठाची परियेसा ॥५४॥जया जिवास चढला अहंकार । त्याचा अधोगती गेला संसार । ते ना उतरती भवसागर । तूं मी द्वैतपणें ॥५५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP