प्रसंग बारावा - षड्‌दर्शनें-पाखांडी भांडणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मुळींचीं साही दरुषनें परंपरा । त्‍यामाजी पाखांड जालें बहुत थोर । येरुन येरांसी करिती किरकीर । मूढ मोकळेपणें ॥७॥
एकाकारणें जाले साहीजण । त्‍यामाजी कां लागलेसें भांडण । सद्‌गुरूची कृपा नाहीं संपूर्ण । म्‍हणोनि द्वैत भासे ॥८॥
जैसे लहानपणीं बंधु बिघडती । थोर जालिया मागुते ते भेटती । येरूनि येरांसी न वोळखती । दरुषनां तैसें जालें ॥९॥
यातियातीमध्यें वैराकार । येरून येरां न देखों शके मांजर । तैसा साहीजणांचा विचार । गिळूं डंखूं म्‍हणती ॥१०॥
जैसा सर्प मुंगुसा वैराकार । वोखटें पाखरूं न निघे बाहेर । स्‍वयाती झडपतील अप्रमाद । यालागीं रात्री फिरे ॥११॥
ऐसा दरुषनांत नाहीं सवाद । एकमेकांचा करिती अप्रमाद । ते चुकले निजगुजाचा प्रेमबोध । कपट धरूनियां हाती ॥१२॥
अवगुण सत्‍य श्र्वानाचें देहीं । श्र्वानास श्र्वान देखों न शके कांहीं । तैसें मनुष्‍यजन्मास येउन पाहीं । दरुषनांस जाले असे ॥१३॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP