मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सातवा| नाम ज्ञान भेद प्रसंग सातवा ईश्र्वरस्तुति-प्रस्ताव ईश्र्वरच खरा मायबाप ईश्र्वर पित्याच्या विसर ईश्र्वराचें सौभाग्य ईश्र्वराचें अपार देणें ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर असत्य भ्रांति नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्टांत नाम ज्ञान भेद शेख महंमदास सर्पदंश प्रसंग समाप्ति प्रसंग सातवा - नाम ज्ञान भेद श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत नाम ज्ञान भेद Translation - भाषांतर अविनाशें संपादिलें प्रति उत्तरा । तुज पूर्ण केल्या होसील बावरा । आंवरेत ना पुरतेपणाच्या झाका थोरा । तुजसी अंतर पडेल ॥७५॥तुज मजविण सर्वत्रीं आवडी । असेल तरी सांडी भाव भक्तीची गोडी । मग देईन तुजला सर्वत्र जोडी । वैकुंठ मुक्ति देखील ॥७६॥निर्गुणा नलगे तुझें सर्वत्र । चारी मुक्ती दिसती अपवित्र । त्या लांचक्या दासींचा अंगिकार । मी न करी सत्य बापा ॥७७॥जेव्हां सद्गुरु कृपा जाली पुरती । तेव्हां रिद्धि सिद्धि ओळंगती । मी तंव त्याकडे न पाहेच सती । तुझ्या नामाचा घोष करी ॥७८॥जैशा साखरेसी वेढिती मक्षिका । त्या वारुनी जेविल्या पाविजे सुखा । तैशा मुक्ती वारिल्या निजनायका । तूं पचीं पडशील ॥७९॥जे लागले रिद्धिसिद्धीचे ध्यानीं । ते चुकले तुज नामालागुनी । पदें भोगिती बहुत आस धरूनी । पुण्य सामुग्री तोंवरी ॥८०॥काळविवंचना करुनि वांचणें । कोणे एके समयीं तरी मरणें । परतोनि श्र्वान शूकर भुजंग जन्म घेणें । लागेल त्या प्राण्यासी ॥८१॥निर्गुणा त्या रिद्धिसिद्धीचें पावन । सांगेन तुझ्या वैकुंठाचें लक्षण । जैसे विधवा कंठी रांडपण । मोकासा घेऊनियां ॥८२॥यालागी वैकुंठाची चाड नाहीं मज । अखंड तुझें चरणी राहेन सहज । निज भाव भक्ती प्रेम द्यावें मज । लडिवाळ भक्त म्हणोनी ॥८३॥जैसा भाग्याचा आला हरुषती वेश्या । सौभाग्य दाऊं म्हणती कैशा । भाग्य सरल्या मोकलती परदेशा । मग देखोनि थुंकती ॥८४॥तदन्यायें तुझिया धांगडी । पदरीं पुण्य तों लाविती गोडी । पुण्य सरल्या करिती देशधडी । चौर्यांशी लक्ष्य पंथें ॥८५॥जों घृतें घागरी भरली संपूर्ण । तोंवरी सिंकां करिती जतन । घृत सरल्या पडतसे फुटोन । खापरीं विष्टा फेडिती ॥८६॥जैसें विषयाचा सुखा लागुन । ॠतुकाळीं गुंतलेसें श्र्वान । सुटल्यावरी पळे जीव घेऊन । तदन्यायें तुझी मुक्ति ॥८७॥बाळपणीं गुळ देऊनियां माता । समजावी लडिवाळ सुता । शाहणे जाल्या चालवे ना तत्त्वतां स्वार्थ देखोनियां ॥८८॥तैसा मी निज स्वार्थासी पातलों खरा । तुझें उचित लटिकें असे दातारा । आम्ही भक्तांनीं केलासी साजरा । हें तूं जाण स्वामी ॥८९॥शेख महंमद म्हणे निर्गुणा ऐकें । तैसें अंधाराचें मोल केलें मयंकें । तैसा वोळखे ज्ञानसायेकें । तुज आम्ही केलें ॥९०॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP