मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सातवा| ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर प्रसंग सातवा ईश्र्वरस्तुति-प्रस्ताव ईश्र्वरच खरा मायबाप ईश्र्वर पित्याच्या विसर ईश्र्वराचें सौभाग्य ईश्र्वराचें अपार देणें ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर असत्य भ्रांति नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्टांत नाम ज्ञान भेद शेख महंमदास सर्पदंश प्रसंग समाप्ति प्रसंग सातवा - ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत पण ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर Translation - भाषांतर स्वयें शरीर मृत्तिकेचा पुतळा । त्यास कर चरण दिधले गोपाळा । पाठ पोंट विषयसुख लीळा । ऐसें देणें तुझें ॥४९॥उदर हृदय मन पवन मति । शुद्ध आत्मज्ञानाची आनंदमूर्ति । भवों लक्ष्मी धन धान्य संपत्ती । मज उदारीव तुझी ॥५०॥सर्व नव द्वारांचा आभार । ऐकें तुझ्या निज नामाचा उच्चार । यावेगळा अनेक ध्वनि दणत्कार । ब्रह्मानंद टाळी वाजल्या ॥५१॥मज ईश्र्वरा नेत्र तुझें देणें । देखिलें सगुण तुझें पोषणें । शुद्ध पवित्र वाचेचें बोलणें । ही मज उदारीव तुझी ॥५२॥या स्थूळाची रसना गोडी। मज चीव घेतां लागे आवडी । परी चित्त जिवें न सोडी । नामस्मरण तुझें ॥५३॥एक दिवटी लावूनि नेला बिर्हाडा । तो म्हणे उपकार केला गाढा । परि रवि शशीचा उपकार वेडा । मानीच ना कांहीं ॥५४॥रवि शशि ईश्र्वराचें दिवटे थोर । या जीवालागीं केला उपकार । अभक्त ना मानिती त्यांचा उपकार । विषयीं लोलुप जाले ॥५५॥कोणी कोणास बैसों घातली तिवासी । तो जन्मभरी आठवी उपकारासी । पहा ईश्र्वरें आंथरिलें महीसी । मूढ उपकार न मानिती ॥५६॥कोणी मंडप दिधलयाचा उपकार । तो जन्मभरी आठविती नर । ईश्र्वरें मंडप दिधला नभाकार । जीव असोनि न मानिती ॥५७॥कोणी दिधली पालखी छत्र घोडा । तो आखुरजादा म्हणवी रोकडा । देह सरल्या जालासे वेडा । चौर्यांशी लक्ष भोगिता ॥५८॥महा उष्माकाळीं कळवळिती जीव । कोणी नाठविती ईश्र्वराचा आठव । वडवानळ धाडिला उपाव । ईश्र्वर छत्रीची साक्ष ॥५९॥छत्री पालखी राज्यपद भोगणें । ऐका तेंहि ईश्र्वराचें देणें । जैसें भावें भजणें तैसें घेणें । कल्पनेसी पावती ॥६०॥भव सुख दुःख ईश्र्वराचें देणें । महा तप सामोग्री करूनी मरणें । कोणी रुसावया नाहीं कारणें । आहिक्यीं आहिक्य श्रोते ॥६१॥शेख महंमद म्हणे निर्गुणासी । बा वर्णवे ना तुझिया रूपासी । अगाध दिसती उपकाराच्या राशी । उत्तीर्ण नव्हेचि कांहीं ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP