मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सातवा| ईश्र्वर पित्याच्या विसर प्रसंग सातवा ईश्र्वरस्तुति-प्रस्ताव ईश्र्वरच खरा मायबाप ईश्र्वर पित्याच्या विसर ईश्र्वराचें सौभाग्य ईश्र्वराचें अपार देणें ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर असत्य भ्रांति नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्टांत नाम ज्ञान भेद शेख महंमदास सर्पदंश प्रसंग समाप्ति प्रसंग सातथा - ईश्र्वर पित्याच्या विसर श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत पण ईश्र्वर पित्याच्या विसर Translation - भाषांतर ऐसाच संसारव्यापें व्यापला । तो संसारव्यापेंचि भक्षिला ईश्र्वरपित्यालागीं विसरला देह अभिमान गुणें ॥१३॥प्रकृति स्वार्थबुद्धीची ज्ञानें । माझें माझें म्हणती अज्ञानें । मृगजळास देती आलिंगनें । मूर्ख वाद धरूनियां ॥१४॥मृगजळें झळया पळती । जनांस बोलतां माझे भार तोलती । तरी खदखदां शहाणे हांसती । मूढ वेडे म्हणोनियां ॥१५॥तैसें जनसंतानाचें माझेंपण । देखोनि हांसती ते साधुजन । म्हणती मिथ्या नाउलें हें अज्ञान । यालागीं ज्ञान सांगती ॥११६॥जैसें निजेलें बरळे चोराचियां भेणें । दटावला सावध होता त्यानें । तैसे भ्रमिष्टास आत्मज्ञातेपणें । साधु हेडावतील ॥१७॥जैसीं स्त्रीच्या शिंदाळाचीं पोरें । उजविली विहित्या भ्रतारें । शिंदळशिंदळीसी वाटे बरें । याची न होती म्हणोनियां ॥१८॥तदन्याय या जनाचा परियेसा । माझे म्हणोनि कवळी दाही दिशा । दृष्टी देखतां होतसे निराशा । डोळे झांकुनी आंधळे होती ॥१९॥एका दृष्टांताचें बहुत दृष्टांत । सांगतो सद्भेदाची मात । वेगळाले बोलणें बोलाविरहित शेख महंमद सांगे ॥२०॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP