प्रसंग सातवा - असत्‍य भ्रांति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


उपकार आत्‍मज्ञानें न्याहाळितां । प्रेमें उमासा येतों वर्णितां शरण रिघतों श्रोत्‍यां संतां महंतां । ईश्र्वर उपकार वर्णावया ॥६३॥
आपल्‍या प्रारब्‍धें जीव तळमळी । मग ईश्र्वरासी देतो शिव्या गाळी । भोग आलिया पापपणें न्याहाळीं । अनेक पापें आचरें ॥६४॥
जो भोगें वेष्‍टिला असे जोजारी । निशीं पडला असे पलंगावरी । म्‍हणे उठा माथ्‍या आली दुपारी । कुटुंब सावध करतां ॥६५॥
तेव्हां निशी असे एक प्रहर । ईश्र्वराविण असत्‍य बरळे गव्हार । भोग आल्‍याचा ऐसा बडिवार । ईश्र्वरासी विसरोनि जाती ॥६६॥
महा पुण्याच्या बळें जाला भाग्‍याचा । भ्रांति शोख करिती असत्‍याचा । प्रेम घोष न करी हरिनामाचा । पुण्यापुण्य वाढावया ॥६७॥
शेख महंमद विनवी जगजीवना । नांवे बोलतां न येती मधुसुदना । शब्‍द वाणी द्यावी करावया वर्णना । नाम ज्ञान भेदाची ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP