प्रसंग पांचवा - खरा जंगम अय्या महात्‍मा कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अर्ध ऊर्ध्वं तापे कागे वैराग्‍यें । कुंडलिनीचेनि माया गुण रंगे । जो एक योगी निवे अष्‍टांगें । तो तत्त्व जोगी खरा ॥८८॥
जंगम तो ज्‍यास कळे आगम । आयागमनाचा करी निर्गम । जिव शिव होऊनि सांडी श्रम । कडू गोड तैसे जालें ॥८९॥
आधार स्‍वाधिष्‍ठान मणिपुर चक्र । अनुहात भिक्षा करी ॐय नमो शिवाकार । बोधनंदीवरी आरूढ स्‍थिर । तो सत्‍य विरक्त अय्या ॥९०॥
कपट्या महात्‍मा सांगेन विचारें । चौघी रांडा मुंडिली छत्तिस पोरें । हे त्रिपदि भिक्षा बहात्तर घरें । श्रद्धा उलटी काठी ॥९१॥
त्रिवेणीदुध्या शोधी सत्रावीचें पाणी । स्‍वयें अष्‍टदळ कमळीं बैसे विजनीं । चिन्हाकारें कृष्‍ण आणि ध्यानी । अचेतनी दंडवत ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP