प्रसंग पांचवा - सच्छिष्‍याची वाण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पवित्र सच्छिष्‍याचा दुष्‍काळ भारी । स्‍वामी तुम्‍ही उत्तम केली हेरी । शीघ्र स्‍वहिताचा होय अधिकारी । तैशाची तुटार मोठी ॥११॥
सद्‌गुरु तुमचे पारखीपुढें । मी तंव जालो असे भ्रमिष्‍ट वेडे । ज्ञान विज्ञान चहूंकडे वावडे । परी निर्मळ न दिसे ॥१२॥
बक ढोंक काग नदी थिल्‍लरी अपार । मानस सरोवरीं राजहंस चतुर । तैसे पवित्र थोडे बहु गव्हार । कोंदलें त्रिभुवनांत ॥१३॥
कांट्या बोराट्यांनीं वन भरले । लाविल्‍याविण आपणच निघाले । तैसे जनाचें विजन जालें । सद्‌गुरुस नेणतां ॥१४॥
मेथी कोथिंबर सायासें लावली । तांदुळजा घोळ बिदीस उगवली । तैसी दुर्जनें सृष्‍टि भरली । गुणाईत सायासें ॥१५॥
बारा वरुषां प्रसवे ते व्याघ्री । ती मासां प्रसवे ते मांजरी सूकरी । तैसे घरोघर दुष्‍ट दुराचारी । पापें आचरतील ॥१६॥
जैसा बारा वरुषां जन्मला व्याघ्र । तैसी साधुजनांची तुटार । अभक्तांस जन्म असंख्यात विस्‍तार । विष्‍टेंत जीव जैसे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP