TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रसंग पांचवा - गुरूच्या सहाय्याची आवश्यकता

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शिष्‍यास गुरूच्या सहाय्याची आवश्यकता
ॐ नमो विवेक दौत मैस लेखणी । तुमच्यानें लिहिली अक्षरे वाणी । त्रिवेणी दौंतींत सत्रावीचें पाणी । घातलें मूळबंधें ॥१॥
कोरा कागद तो शून्याकार । अनुभव लेखणी ती जाहीर । वरी मांडिलें क्षर अक्षर । आत्‍मप्रचीतीनें ॥२॥
संपल्‍या प्रसंगांचें चतुष्‍ट । अनुसंधान धरिलें चोखट । श्रोत्‍यांनीं पावावें निकट । उदार चित्त विवेकीं ॥३॥
जो कांहीं पोहों नेणें अद्यापवर । कासेस लागे होऊनियां उदार । तरी तो पैलथडी पावेल साचार । एकविधपणें ॥४॥
नेणतां कासेस लागल्‍या उपरि । मग मध्येंच जाऊनी चरफड करी । तरी तोचि बुडेल वोळखा अविचारी । सांगेन टीका पुढें ॥५॥
तैसें स्‍वयें लागावें सद्‌गुरूचे कासे । लाटा उडतील विषयांचे तमासे । त्‍यांत बुडो नेदी सद्‌गुरु उल्‍हासें । पुरुषार्थ करी ॥६॥
आपले पायी बांधोनि सांगडी । जाणता जरी पोहों निघे आवडी । तो कैसा तरेल वोळखा वेलाडी । या अभाविकांची ॥७॥
पूर्व संचितें सद्‌गुरु लाधला । तो जरी स्‍वयें अभावें पूजिला । तरी आपला आपण गोता खादला । बोल कवणा नाहीं ॥८॥
सद्‌गुरु करूनियां धरिजे अभाव । तें पाप फिटावया च चले उपाव । म्‍हणोनि न करावी शिष्‍यांनीं माव । सद्‌गुरुस्‍वामीसी ॥९॥
आतां शेख महंमद बोले श्रोता । अहो जी नित्‍य मुक्त सद्‌गुरु दाता । तुम्‍ही सच्छिष्‍या निवडिलें तत्त्वतां । तैसे लक्षा न येतें ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:11.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली

  • तेली, माळी व मुसलमान यांचा काही एक संबंध नाही. त्याप्रमाणें जेथे आई, बाप व लेक यांचा स्वभाव, गुण, आचरण यांचा परस्परांशी मुळीच मेळ नसतो. अशा वेळी म्हणतात. मिश्र विवाहाची अनिष्टता दाखवितांना योजतात. 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site