प्रसंग पांचवा - दुकाळे साधु गोसावी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


रांडे सांडे आळशी जाले भांडे । तंत्रे मंत्रे जन ठकिती काळतोंडे । महांडुळ जन्म घेती दुतोंडे । मनुष्‍य देह सरल्‍या ॥५६॥
हेत चित्त वृत्ति नसतां अनुरागी । जटाजूट भस्‍म लावितील अंगीं । जैसे भांड विनटले योग्‍याचें सोंगीं । तदन्याय त्‍याचा असे ॥५७॥
दुकाळे उत्तम मध्यम कनिष्‍ट केले । तैसे घरोघरी गोसांवी म्‍हणों लागले । स्‍वयें भ्रष्‍ट पवित्रातें भ्रष्‍टवूं लागले । गुरुत्‍व ठावेंचि नसतां ॥५८॥
फुकाची राख फुकाची कावी । फुकाच्या वस्त्रांस फकाच लावी । परी स्‍वयें साक्ष नव्हेच अनुभवी । अहंकार मारूनियां ॥५९॥
दुकाळीं भ्रष्‍टल्‍याचें सुकाळी प्रायश्र्चितु । अधर्मीं गोविल्‍या उपदेशिती साधु । सर्वत्र पाखांडाचा करी छेदु । आत्‍मज्ञान प्रबोधें ॥६०॥
सांडुनियां आत्‍मज्ञानाची चक्रें । लोखंडाचीं वागविती अपवित्रें । यावेगळी अनेक शस्त्रें । ते कैसे साधु म्‍हणावे ॥६१॥
ठायींचेच अंगी अविद्येचें वारें । वरी भांग खाऊनि बरळती अनाचारें । जनांत योगी म्‍हणउनी महामारे । नाना तरंग फुंदती ॥६२॥
वरी वेष पालटुनियां दाविती । परी अंतर्योग शुच न होती । मनुष्‍य देह धरूनी मृढ मती । विसरले ईश्र्वरास ॥६३॥
आपणचि स्‍वयें भोगिती बंदिखाने । मोकळिया जिवास करितीं बंधनें । मोकळे विषय बांधतां अज्ञानें । स्‍वयें शुच धर्मन्याचे ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP