प्रसंग तिसरा - अनुसंधान

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



कळो न कळों हें ऐकतां धावें । वाराणसीचें स्‍नान घडे स्‍वभावें । मूर्खाचें हृदयी नाम नसावें । हा ईश्र्वरें वर दिधला ॥९४॥
आतां अनुसंधान केतकीच्या झाडा । जो शुद्ध निपजला केवडा । तो सुगंध कृपेचा असे निवाडा । कांटे ते अविद्येचे ॥९५॥
पानें चैतन्येचीं अंग महदेचें । सायंकाळी कोमेजणें निद्रेचें । ऐसें मिश्रितपण पांचा शक्तीचें । वोळखा चराचरीं ॥९६॥
जड लोखंडपणें महदेचे असे । जग उमटोनि अविद्याच दिसे । पांढरेपण कृपेचें प्रकाशे । अंगसंगें समस्‍तांठायी ॥९७॥
सुवर्ण तें असे कृपेचा अंश । बिंब तो ईश्र्वराचा प्रकाश । तेथें चहूं शक्तींच लवलेश । झळंबू न शके ॥९८॥
हीं नातीं सूक्ष्म दृष्‍ठीनें पाहिलीं । अनुभव दृष्‍टीनें देखिलीं । तीं सांगेन करून वेगळालीं । श्रोत्‍यांतालगुनी ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP