मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग तिसरा| ग्रंथश्रवणफल प्रसंग तिसरा जीव निद्रा प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता शक्तीचें रूपवर्णन शक्तींचा पृथक बोध पूर्वजन्म-पृच्छा स्वकुलवृत्त सिंधुसरिता दृष्टांत ग्रंथश्रवणफल कृपा व अविद्या महाशक्ती अनुसंधान आत्मा प्रसंगसमाप्ति प्रसंग तिसरा - ग्रंथश्रवणफल श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत श्रोतावक्ताभाव-ग्रंथश्रवणफल Translation - भाषांतर मग वचन केलें देवाधिदेवें । जे प्राणी ग्रंथ ऐकतील भावें । त्यासीं गुह्य गुरुत्व पडेल ठावें । विवेक करितां ॥६१॥विनवून पुसतों एक बोले । ऐकिलें बहुतांठायीं म्हणितलें । त्याचें गुह्य पाहिजे सांगितलें । श्रोतयालागीं स्वामिया ॥६२॥ऐकणार असंख्य लक्ष कोटी । सांगणाराची तुटार मोठी । अहिक्यें सांगावीं गुजगोष्टी । भासावयालागुनी ॥६३॥सद्गुरु म्हणती ऐकता विचारें । जैसं द्वैत जोडिलें टाकणखारें । तैसें वक्त्याश्रोत्यांसीं प्रकारें । अनुसंधान पाहिजे ॥६४॥जैसा उंदिर चिंचाइल्या मांजर । तनुमतेंसी होय एकाग्र । तैसें ऐकोनि वक्त्याचें उत्तर । ऐहिक्यीं पातावें ॥६५॥यासी आश्रय नाहीं शास्त्रपुराणें । जैसें कोणी एकाचें बोलणें । जैसे स्वात्मसुख केलें जनार्दनें । तैसा हा उद्गार ॥६६॥कोरा कागद भर्तृहरीनें पाठविला । त्याचा जाब गोरक्षनाथानें दिधला । तेव्हां कोणाचा आश्रय हें बोला । शास्त्रीगण हो तुम्हीं ॥६७॥जैसा परमात्मा असे निराकार । तैसें त्याचेंहि बोलणें निराधार । आधार त्याचपासूनि साचार । जाला होत असे ॥६८॥अनेक शास्त्रें अनेक कवीश्र्वर । जाले अनेक होतील अपार । परी एकसारिखें एक उत्तर । न वसे दावा कोठें ॥६९॥जें आहें तें युगादि निर्मळ । नव्हें म्हणणें हेंचि पापाचें मूळ । शब्दकथनें कथिती केवळ । पुरातनच असे ॥७०॥आधारें आधार कथन बोलणें । तें जाणिजे शिजलेंचि शिजवणे । परी आत्मज्ञान नव्हेच परिसणें । श्रोते हा तुम्ही ॥७१॥जुनी मूळ वस्तु ‘उ’कारत्वें । आत्मज्ञान तरी असे नित्य नवें । नवी घडामोड वोळखा स्भभावें । नीरतरंग न्यायें ॥७२॥जैसें चैत्रमासीं फुटती अंकुर । तैसा सद्गुरुकृपेचा विस्तार । साठवितां टांच दिसे नमस्कार । आत्मज्ञानापुढें ॥७३॥पाषाण पर्वतावरी तरुवर । चैत्रमासींचा उष्णकाळ थोर । तेव्हां फळपल्लवेंसी फुटती तोबर । पुष्पफळांचे ॥७४॥पर्जन्यकाळीं उदक अपार । रानोमाळ भरलें सरोवर । तेव्हां का कळाहीन तरुवर । आश्रय असतां ॥७५॥आत्मचर्चा हे नित्य नवी । ज्ञानाची करुनी ठाणदिवी । पांचा इंद्रियांतें चोजऊनि जेवी । तोचि जेवणार ॥७६॥हें श्रीमुखींचें गीतासाक्षवचन । ज्ञान ठाणदिवीचा प्रकाश गहन । शेख महंमदीं केलें भोजन । मीनऊर्ध्वंमुखें ॥७७॥असो हा विस्तार निजानंद । आणिक एक आठवला विनोद । सद्गुरुसी म्हणे शेख महंमद । अवधारा स्वामी ॥७८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP