प्रसंग तिसरा - कृपा व अविद्या

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



सद्‌गुरु म्‍हणती माझिया लडिवाळा । काय विनोद आठविला वेल्‍हाळा । तो मजपें वेगी बोल रे बाळा । कौतुक तुझें ॥७९॥
कौतुक विवेक विवंचना । आणिक भासों लागली प्रकाशना । गुप्त प्रगट वाटे विवंचना। मज बोलावयास ॥८०॥
तुम्‍ही मागें चारी शक्ती सांगितल्‍या । त्‍यांसी अंतर्यामी सोयरिकी जाल्‍या । विज्ञान ज्ञानें मज कळों आल्‍या । तुमचिया पुण्यें ॥८१॥
कृपेसंगें रामचा अवतार । अविद्या प्रसवली तो दशशीर । तेणें चालविला वैराकार । रघुनाथासी ॥८२॥
कृपेसंगें कृष्‍ण अवतरले । कंस दुर्योधन अविद्येसी जाले । दावा धरूनी मृत्‍यूतें पावले । विरोधभक्तीनें ॥८३॥
ऐसीच दहा अवतारांची माता । कृपा पद्मिनी वोळखा तत्त्वतां । बत्तीस लक्षणी पुतळा तो पिता । त्‍याचा सत्‍य जाणा ॥८४॥
निंदक अविद्येचे कुमर जाणा । नानापरीं छळती साधुजना । मुळींचाचि दावा चाले त्रिभुवना । चराचरीं वोळखा ॥८५॥
श्रोते म्‍हणती शेख महंमद । आम्‍ही एक पुसतसों भेद । शक्तींचा मिश्रित अनुवाद । आम्‍हांस सांगावा ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP