मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग तिसरा| महाशक्ती प्रसंग तिसरा जीव निद्रा प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता शक्तीचें रूपवर्णन शक्तींचा पृथक बोध पूर्वजन्म-पृच्छा स्वकुलवृत्त सिंधुसरिता दृष्टांत ग्रंथश्रवणफल कृपा व अविद्या महाशक्ती अनुसंधान आत्मा प्रसंगसमाप्ति प्रसंग तिसरा - महाशक्ती श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत महाशक्ती-भेदाभेद-अनुवाद Translation - भाषांतर ऐका खलविद शक्तीचा निवाडा । बयाजवार शक्तींचा पवाडा । वदनीं गोष्टी उमटतील गोडा । नामीं कृपेच्या ॥८७॥कृपा शक्तीची परावाचा असे । चैतन्याची वैखरी दिसोनि ना दिसे । मध्यमा महदेची विश्र्वास असे । जनामध्यें प्रसिद्ध ॥८८॥लिंग निद्राशक्तीची पश्यंती । वाचा स्थूळ देहसंगें बरळती । हे तंव लहानथोरां प्रचीति । चर्माचीं म्हणोनियां ॥८१॥आत्मज्ञान कृपेचे आभास भासे । दुष्ट बोलणें अविद्येचें मुख रुसे । शास्त्रज्ञानें महदेचें वर्तन असे । प्रसिद्धपणें जनीं ॥९०॥चैतन्याची मध्यमा असे वाणी । अविद्या तान्हेली कृपा पाजी पाणी । उचकी लागे महदेची घालणी । कृपा निवांत करी ॥९१॥श्रोत्यांस साष्टांग नमस्कार । सावध ऐकावा हा भेदाकार । अनुसंधानी चित्तमनें उदार । होऊनियां ऐकिल्या चुके नरक उपाव । शेख महंमद म्हणे ॥९३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP