मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्णाजी नारायण आठल्ये| श्लोक [शार्दूलविक्रीडित] कृष्णाजी नारायण आठल्ये प्रस्तावना श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [मालिनी] श्लोक [इंद्रवजा] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [इंद्रवज्रा] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शिखरिणी] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [पृथ्वीवृत्त] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [स्त्रग्धरा] श्लोक [द्रुतविलंबित] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [पृथ्वीवृत्त] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [स्त्रग्धरा] तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित] हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले. Tags : poemsongकवितागाणीमराठी श्लोक [शार्दूलविक्रीडित] Translation - भाषांतर ओली होउनियां किती सुरकुते अंगावरी कातडी ।पित्तें मस्तकही फिरूनि तुटती ओकोनिया आंतडीं ॥ऐशी संकटमालिका घडिघडी उत्पन्न होते नवी ।वर्णायास्तव ती यथास्थित बरी मी काय आहे कवी? ॥१०॥येते भोंवळ मस्तकांत न सुचे कांहीच खाणें पिणें ।वाटे ओढुनि घेतलें व्यसन मी देवा ! नको हे जिणें ॥कोठें सुंदर बालकें चिमुकलीं कोठें प्रिया लाडकी ।हा हा मृत्यु गमे क्षणक्षण मला येतो तया आड कीं ॥११॥तोंडें वासुनि नक वक्र गतिनें ग्रासावया धावती ।मासे पर्वतसे अनेक जवळी येवोनिया पावती ॥ऐशी क्रूर न दूर तीं चलचरें पाहोनि वाटे भय ।मार्गामाजि असे प्रसंग पडती सारेच ते दुर्जय ॥१२॥पक्ष्याच्याच समान मत्स्य उडुनी दिग्मंडळी राहती ।शुंडा उंच करोनि तंतु टपुनी वेढावया पाहती ॥मेघीं वीज कडाडुनी चमतके गर्जोनि केव्हां नभीं ।काळाची जणुं ही ससज्ज सगळी सेनाच राहे उभी ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP