मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्णाजी नारायण आठल्ये| श्लोक [मंदाक्रांता] कृष्णाजी नारायण आठल्ये प्रस्तावना श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [मालिनी] श्लोक [इंद्रवजा] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [इंद्रवज्रा] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [शिखरिणी] श्लोक [मंदाक्रांता] श्लोक [पृथ्वीवृत्त] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [स्त्रग्धरा] श्लोक [द्रुतविलंबित] श्लोक [शार्दूलविक्रीडित] श्लोक [पृथ्वीवृत्त] श्लोक [भुजंगप्रयात] श्लोक [स्त्रग्धरा] तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता] हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले. Tags : poemsongकवितागाणीमराठी श्लोक [मंदाक्रांता] Translation - भाषांतर देवा देवा ! कुठूनि तरि तूं आणिशी ही लढाई ! ।जाती सारे हुरळुनि तिची ऐकुनीया बढाई ॥‘‘शस्त्रें वस्त्रें सकल मिळुनी मोठमोठे पगार ।दर्या माजी सुखकर हवा बर्फही थंडगार’’ ॥१॥‘‘लोकीं होतें प्रगट सहजीं आपुली राजनिष्ठा ।शूरांमाजी करिति गणना देऊनीया प्रतिष्ठा ॥धैर्ये शौर्यें चढूनि बळ तत्तेज अंगीं विराजे ।योद्धे सारे सारे स्तवन करुनी मान देतात राजे’’ ॥२॥‘‘भालीं दैवें मरण लिहितां कोण कोठें पळेल ।अंतःसद्मीं लपुनि बसुनी सांग कां तें टळेल ?॥धारातीर्थीं पतन घडतां कोणता सांग तोटा ।स्वर्गश्रीही मिळुनि घडतो कीर्तिचा लाभ मोठा ॥३॥‘‘ऐशीं स्वर्गासम बहु फळें दाटलीं एक जागीं।स्यांतें हातें ढकलिल बळें तोच लोकीं अभागीं ॥मी तों मागें समजुनि असें काय घेईन पाय ।भाग्यें हातीं सहज पडला सौख्यदाता उपाय’’ ॥४॥‘‘ऐशीं संधी नवस करुनी काय येई फिरून ।जाणोनी दे अनुमति मला धैर्य चित्तीं धरून ॥’’ऐशी माझी करूनि समजी हाय गेलांत नाथा ।मी तों येथें झुरत पडलें कोण वाली अनाथा ॥५॥विलायत कुठें कुठें शहर भव्य तें लंदन ।अहर्निश जलामधें पळति अग्निचें स्यंदन ॥दिसे भरूनि राहिला दशदिशा महासागर ।तुफान उठतां गमे निवळ मृत्युचें आगर ॥६॥पडे झुकुनि बोटही घडिघडीस बाजूवरी ।धका बसुनि माणसें सकल कावरीं बावरीं ॥धडाधड उडोनिया पडति एकमेकावरी ।सुटोनि कर लोळती कवण तैं कुणा सावरी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP