मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - दोघेजण बाळ नारा म्हादा ता...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


दोघेजण बाळ नारा म्हादा तान्हें । बांधियेलें तिनें मागें पुढें ॥१॥
उडी ते घातली भींवरेचे डोहीं । आला लवलाही पांडुरंग ॥२॥
येउनी शिरला भीवरेचे डोहीं । ओढोनी राजाई ठेवी कांठीं ॥३॥
पाहे तों राजाई कांठीं उभी आहे । क्रोधें बोलताहे विठ्ठलासी ॥४॥
क्रोधें म्हणे देव कांरे जाचितोसी । लल्लाट महिषी आपटिलें ॥५॥
क्रोधें ते आणिक टाकियली उडी । नेली पैलथडी विठ्ठलानें ॥६॥
मग ते राजाई चालिली घरासी । देखिला वाटेसी मेला सर्प ॥७॥
सर्प तो घेउनी वेगी आली घरासी । ठेवी शिजावयासी चुलीवरी ॥८॥
सर्प हा शिजला खाऊं पांचजणें । केला विचार तिनें गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP