मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - नामयाचा नेम पाहों आदरिला ...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


नामयाचा नेम पाहों आदरिला । मनामध्यें केला नेम तिणें ॥१॥
मनामध्यें म्हणे आणिक द्यावें बोणें । पाहावी हे खूण कैसी आहे ॥२॥
एके दिवसीं बोणें दिल्हें नाम्यापाशीं । न्यावें हें देवासी म्हणे माय ॥३॥
नामा म्हणे आई जेवील ह्रषिकेशी । आणिक मारिसी मज काय ॥४॥
न मारी म्हणोनि बोलिली गोणाई । माथा ठेवूनि पायीं चालीयेला ॥५॥
नैवेद्य घेऊनि मेला विठूपासीं । बैसले सुखेसी तिघेजणें ॥६॥
तिघेजणें एके ठायीं ते जेविलीं । गोणाई अवचित आली तेथें ॥७॥
कवाडा आडुनी पहात मोणाई । तिघे ऐकठायीं जेविताती ॥८॥
जेवितां देखिले आली ते घरासी । साक्ष आली तिसी गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP