श्रीमदिदिंराकांत पदे

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३१. वें.
धन्य धन्य धन्य आजि सुदिन उगवला पहा । श्रीगुरुतवपादुका सुयोग लाभला महा ॥ धृ० ॥
भक्त जनोत्धारक प्रभु परतगाळिं राहिले । योगि जनानंद सदय उदयरूप पाहिले ॥ धन्य० ॥१॥
सुंदर शिबिकासनांत हास्य वदन शोभती । वैष्णव पथ सत्य म्हणुनि उघड जना दाविती ॥ धन्य० ॥२॥
आत्मरंगिं रंगुनियां प्रेमभरें डोलती । नारायण नाम वदनिं मंजुरवें बोलती ॥ धन्य० ॥३॥
कृष्ण जगन्नाथ तनय नम्र चरणिं लागला । श्रीगुरुच्या पूर्ण कृपें शाश्वत सुख लाधला ॥ धन्य० ॥४॥
पद ३२. वें.
श्रीमदिंदिराकांत शांत वेदांत विभूषण पाहूं । विकल न करितां चित्त सकल मिळुनियां चरणि शिर वाहूं ॥ धृ० ॥
हास्यवदन चिद्रत्न सदन, गुरुराज अंतरीं भाऊं । कुंदरदन सुंदर तनु वंदुनि, शाश्वत सन्निध राहूं ॥ श्रीम० ॥१॥
ध्यानधारणाभ्यासबलानें, मन हें तत्पदिं लाऊं । वृत्ति विरामीं स्फुरतें सुख तें, निरहंकारें लाहूं ॥ श्रीम० ॥२॥
श्रीमद्वैष्णवसद्‌गुरु भय हर, गोड नाम मुखिं गाऊं । दिवस रजनि हरि भजनि रमुइनियां, चित्सुख पेढे खाऊं ॥ श्रीम० ॥३॥
सोडुनि  भीती ऐशा रीती, भाव बळें जरि जाऊं । कृष्ण जगन्नाथ तनय बोले, श्रीविठ्ठल पद पाऊं ॥ श्रीम० ॥४॥
पद ३३. वें.
तोषविलें गुरुनाथा । ही देउनि भेटी दीन अनाथा ॥ धृ० ॥
तुजविण कोणि न त्राता । याभूधरिवासि जनांतें आतां ॥ तो० ॥१॥
ठेवुनि चरणीं माथा । मी गाईन घडि घडि निजगुण गाथा ॥ तो० ॥२॥
कृष्णसुताची माता । तूं एकचि प्रेम सुखाचा दाता ॥ तो० ॥३॥
पद ३४. वें.
जय वैष्णव सद्‌गुरु श्रीमदिंदिराकांत पाहूं ॥ धृ० ॥
कमला नाथा घेउनि संगें । आले यद्दर्शनिं मन रंगे । मंगलमय मुख निरखुनि सुख नि:संग लाहूं ॥ जय० ॥१॥
तप्तकनकसम कांति जयांची । जनक जननि जे भक्त जनाची । सनकचि केवळ गमत वदनिं तन्नाम गाऊं ॥ जय० ॥२॥
विषय वमनसम समजुनि हें मन । विमल पदकमलिं लाउनि करुं नमन । मरण जनन हर यतिवर सन्निध नित्य राहूं ॥ जय० ॥३॥
नरजन्माचें सार्थक साचें । भजन रजनि दिन गुरुचरणाचें । धरुनि विनय कथि कृष्णतनय भव पार जाऊं ॥ जय वैष्णव सद्नुरु श्रीमदिंदिराकांत पाहूं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP