मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें|स्फूट पदें| श्रीमल्लिकेशाचें पद श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीमल्लिकेशाचें पद Translation - भाषांतर पद २९ वें. यारे पाहुं चला मल्लिकेश सदयाला । भक्तांसाठीं जो जाला प्रभु उदयाला । तारिल निश्चय हा सत्यचि गमत मनाला । आत्म जनाला ॥ धृ० ॥प्रेमें जे भजती मजला त्यां पदिं थारा । देउनि उद्धरिं मी वारुनियां जडभारा । जे नर कपटी त्यां घेउनियां अवतारा ॥ चाल ॥करितों शिक्षा मी समजवि हें सकळांला । प्रत्यय आला ॥ या० ॥१॥ज्यां निजभजनाची आवडि मानसिं मोठी । दासां त्यां नुरवी भव दु:खाच्या कोटी । सायुध संरक्षी राहुनि पाठि पोटीं ॥ चाला ॥यास्तव चालविलें कीर्तन सप्ताहाला । व्या लाभाला ॥ या० ॥२॥चक्षू गुण गज भू शक साधारण नामें । वर्षीं आषाढीं कृष्णाष्टमिला प्रेमें । केलें आरंभा या देवालयिं नेमें ॥ चाल ॥श्रीमद्गुरुवारीं करुनि नाम गजराला ॥ स्मरुनि चरणाला ॥ या० ॥३॥सातचि वर्षे ही सेवा कीं न करावी । नित्यचि भजनाच आवड पोटीं धरावी ॥ गिरिजानाथाची चिन्मय मूर्ति वरावीं ॥ चाल ॥पावन नाम खरें नुरवि कामलेशाला ॥ सुखधामाला ॥ या० ॥४॥जय जय राम हरे कृष्ण हरे गोविंदा । संगें सुजनाच्या नित्यचि हा करुं धंदा । मिळुनि सर्व आम्हीं सेवुं परमानंदा ॥ चाल ॥ सनकादिक तरले धरुनि या मार्गाला ॥ जिव हा धाला ॥ या० ॥५॥नामस्मरणाचा महिमा फारचि मोठा । स्मरत्यां संसारीं परमार्थीं नच तोटा । बोला विश्वासें जाळिल दुष्कृत कोठा ॥ चाला ॥ आला येत असे अनुभव कृष्ण सुताला ॥ कथित सुजनाला ॥ या० ॥६॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP