मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें|स्फूट पदें| श्रीवेंकटेशाचीं पदें स्फूट पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांत पदे श्रीकमलानाथतीर्थ पद श्रीकृष्ण महाराज बांदकर श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीवेंकटेशाचीं पदें Translation - भाषांतर पद २४. वें. श्रीवेंकटरमणा संकटहरणा करितों वंदना । प्रेमें करितों वंदना ॥ धृ० ॥तूं एकचि तारक साचा । प्रतिपालक निजभजकांचा । चालक तैसा त्रिजगाचा । हे वाचा रमवुनि नामिं भवाच्या तोडीं बंधना ॥ श्रीवेंकट० ॥१॥निर्विकार मुळिंचा होसि । परि घेउनि अवतारासि । निजभक्तजना सुखदेसि । नाशी दुरित तें करुनि सकल दुष्टांच्या कंदना ॥ श्रीवेंकट० ॥२॥ह्रदयांत स्फुरत सुख तो तूं । जो व्यापक निज निहेंतु । तव नाम भवजलधि सेतु । हें गुह्य परम गुरुराज कथित कृष्णाच्या नंदना ॥ श्रीवेंकटरमाणा संकटहणा करितों वंदना ॥३॥पद २५. वें. वेंकटेश क्लेश हरुनि तो परेश सुखवी मजला । घेउनियां नानारूपें भक्त कार्य करण्या सजला ॥ धृ० ॥सगुणमूर्ति पाहुनीयां अंतंरग प्रेमें भिजला । न बोलवे सुख तें वदनिं सख्या काय सांगूं तुजला ॥ वेंकटेश० ॥१॥श्रीभूदेवि दक्षिण वामीं विराजती ज्याच्या विमला । कृष्णतनय वंदुनि चरणा जन्ममरण हरण्या भजला ॥ वेंकटेश० ॥२॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP