मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग १५१ ते १७५ शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग १५१ ते १७५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १५१ ते १७५ Translation - भाषांतर आतां कायसें जिणें । शोक दुर्ग जाणणें । व्यर्थ जिणें पुत्राविण । जाण माझें ॥१५१॥निपुत्री जन मज म्हणती । देव पितर स्वर्गीं कष्टती । ऐसें काय केलें गा श्रीपती । मजलागीं ॥१५२॥शुक नये काकुलती । वनांत हिंडतो मोह चित्तीं । पुत्रा पुत्रा हें वदती । साद देता श्वापदें ॥१५३॥पूर्व जन्मींचा तूं पिता । कय पाळिलें ताता । कर्मावसानीं आतां । आह्मी वृद्ध झालों ॥१५४॥ऐसी ऐकोनि वाग्वाणी । नाद न माय गगनीं । मग व्यासऋषि तेथुनी । परतला मागें ॥१५५॥इतुका वृत्तांत झाला । व्यास आश्रमा आला । शुक-देव पावला । सुख सरोवरां ॥१५६॥योगेश्वरीं देखिला । धांवो-नियां आलंगिला । आपले आश्रमसी आणिला । तापसी जाणोनियां ॥१५७॥तये गुंपे भीतरीं । तेजोरूप अवघ्या नारी । एकीहुनी एक सुंदरी । परी विकल्प अंतरीम । येऊं न दे ॥१५८॥मग निघो-नियां बाहेरी । वस्त्रें टाकिती सुंदरी । शुक देवासी कवणीये परी । मानविती ॥१५९॥मग शुक्रें अर्ध्यदान केलें । दर्भासन घातलें । त्यावर आपण बैसले । ऋषिसुत ॥१६०॥यज्ञ विभूति आणिली । शुकें सर्वांगीं लविली । मग वस्त्रें घेतलीं । भगवानरूपें ॥१६१॥वृक्ष चंपके वेल पत्रीं । गुंफेमाजी मिरवती । विश्रांत वनीं विज्ञान-वल्ली । ते स्वीकारी तळभरीं ॥१६२॥शुक आसनीं बैसला । ध्यानीं निश्चल राहिला । आवर्ण आपण विसरला । ब्रह्मयोगी ॥१६३॥शुकदेवें मांडिलें ध्यान । मुखीं धरिलें मौन्य । नासाग्रीं लोचन । लक्षीत असे ॥१६४॥ब्रह्मनिष्ठ निरंतरीं । वनामाजी तप करी । एक चरणांगुष्ठावरी । करी निद्रा ॥१६५॥ऐसा ब्रह्ययोगी निरंतरीं । वनामाजी तप करी । व्यास घरीं चिंता करी । शुक देवाची ॥१६६॥यावरी प्रार्थितो इंद्रासी । येरे नाभिकार दिधला तयासी । मग तप ढळावयासी । इंद्रें रचिला उपाय ॥१६७॥इंद्रानें रंभेसी केली हाकार । तंव ते पावली सत्वर । जियेचा महा थरार । तापसीयांसी ॥१६८॥तिनें नमिला इंद्रराज । ह्मणे कां जी पाचारिलें मज । जें असेल योजिलें काज । तें सांगा स्वामिया ॥१६९॥तीतें सांगे इंद्रराव । निर्भय तप करीतसे शुकदेव । त्याच्या तपाचा करावा क्षय । त्वां जाउनी ॥१७०॥तंव बोलली ते सुंदरी । विडा दीजे माझे करीं । आतां शुकदेव सत्वरी । आणिन मी तुह्मांपुढें ॥१७१॥इंद्र ह्मणे गे सुंदरी । शुका आणसी जरी । तरी तुज अमरपुरीं । मानवती जन ॥१७२॥मग तियेसी विडा दिधला । रंभेनें शिरीं वंदिला । मग शृंगार केला । नाना परीचा ॥१७३॥अंग तियेचें पातळ । गौरवर्ण विशाळ भाळ । नेत्र जैसे अंबुजदळ । चंपकवर्ण । तियेचा ॥१७४॥कांसें कासुनियां वीरगुथी । बरवी वेणी रुळे पृष्ठीं । कटि सामावे मुष्टीं । तये रंभेची ॥१७५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP